‘माॅर्निंग वाॅक’ आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:00 AM2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:49+5:30

जिल्ह्यात पहाटे ४ वाजतापासून हाैशी मंडळी माॅर्निंग वाॅकला निघतात. भंडारा शहरात तर जत्राच पहायला मिळते. खात राेड परिसर, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य रस्ते व नदीकाठ परिसरात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळते. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याचाच फटका काेराेना रुग्णसंख्या वाढीवर तर बसला नाही ना, अशीही शंका व्यक्त् केली जात आहे.

‘Morning Walk’ for health or to bring Carina home | ‘माॅर्निंग वाॅक’ आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

‘माॅर्निंग वाॅक’ आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

Next
ठळक मुद्देभंडारा शहरात निर्बंध असतानाही माॅर्निंग वाॅक सुरुच

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी गेला. भीती आणि धास्तीचे वातावरणही बघायला मिळाले. असे असतानाही सकाळी पहाटे व सायंकाळी वाॅकला जाणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली  दिसून येत नाही. परिणामी माॅर्निंग वाॅक आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी केली जात आहे का, असा सवालच उपस्थित हाेत आहे.
जिल्ह्यात पहाटे ४ वाजतापासून हाैशी मंडळी माॅर्निंग वाॅकला निघतात. भंडारा शहरात तर जत्राच पहायला मिळते. खात राेड परिसर, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य रस्ते व नदीकाठ परिसरात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळते. 
संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याचाच फटका काेराेना रुग्णसंख्या वाढीवर तर बसला नाही ना, अशीही शंका व्यक्त् केली जात आहे. विनाकारण बाहेर पडू नका अशी विनंती शासन व प्रशासन वारंवार करीत असतानाही या विनंतीला तिलांजली देण्याचा प्रकार सुरु आहे.
सकाळी ७ वाजतापासून किरणा व अन्य जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडतात. नागरिक तत्पूर्वीच घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे माॅर्निंग वाॅकला वयाेवृध्दांपासून बालकेही जात आहेत. इव्हिनिंग वाॅकिंगचीही अशीच स्थिती आहे. जेवण झाल्यानंतर शतपावली करावी असा बेत आखून बरेचजण घराबाहेर पडत असल्याचे दृश्य आहे. 
शहरातील प्रत्येक वाॅर्डात अशी स्थिती बघायला मिळते. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली असताना या सवलतीचा दुरुपयाेग हाेत असल्याचे दिसून येते. शहरातील मैदाने, रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी थांबता थांबत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून यावर कारवाई संबंधाने पालिका प्रशासनही अपुरे पडत आहे. वारंवार आवाहन करुनही स्थिती जैसे थे आहे. 
काही माॅर्निंग वाॅक करणारे हाैशी मंडळी डबल मास्क घालून फिरायला निघत असल्याचे दृष्य आहे. परंतु आपण काेराेना कॅरिअरतर बनत नाही यावर दुर्लक्ष हाेत आहे.

सवलतीचा दुरपयाेग
विनाकारण माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅकला जाणाऱ्यांमध्ये सर्वच वयाेगटातील स्त्री पुरुषांचा समावेश आहे. संचारबंदीत घराबाहेर पडू नये तसेच सवलतीच्या वेळेतच घराबाहेर पडावे असा नियम असतानाही दिलेल्या सवलतीचा दुरुपयाेग खुलेआम सुरु आहे. पाेलिसांकडून सुट मिळाली आहे अशाच आव वाॅकींग करणाऱ्यांच्या वर्तनावरुन दिसून येते. काेराेना महामारीला हलक्यात घेणे कुणाचाही जीवावर बेतू शकते. ही बाब समजण्यापलीकडे आहे काय? असेच दिसून येत आहे.

काेराेनाची भीती वाटत नाही काय?

मी सातत्याने राेज फिरायला जाताे. मात्र काेराेना संसर्ग असल्यामुळे आम्ही फिरायला जायचे नाही का? मास्कचा वापर व साेशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आहे. काेराेना हाेईल याची भीती मनात आहे. मात्र शरीर स्वास्थ्यासाठी नैसर्गीक ऑक्सिजन घेणेही महत्वाचे आहे. 
- एक नागरिक, भंडारा

काेराेना महामारीने अनेकजण दगावले आहे. ही बाब आम्ही जाणताे. मात्र अनेक वर्षांपासून फिरायला जाणे ही एक सवय दडली आहे. काही दिवस घरातच हाेताे. मात्र याचा परिणाम शरीरावर दिसून आला. परिणामी पुन्हा वाॅकींगला जाणे सुरु केले. मास्क व साेशल डिस्टन्सिंगचे पालन करताे.
- एक नागरिक, भंडारा

 

Web Title: ‘Morning Walk’ for health or to bring Carina home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.