भंडारा तालुक्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:52+5:30

भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या अचानक वाढली.  जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५४८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.

Most active corona patients in Bhandara taluka | भंडारा तालुक्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण

भंडारा तालुक्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण

Next
ठळक मुद्देनियमांचे सर्रास उल्लंघन : ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक धोका, प्रशासनाकडून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी अलीकडच्या काही दिवसात भंडारा शहरात रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण भंडारा शहरात असून नागरिकांकडून मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील विविध भागात नागरिकांची गर्दी कोरोना वाढीसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या १७३ ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण असून एकट्या भंडारा तालुक्यात त्यातील ९७ रुग्णांचा समावेश आहे. 
भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या अचानक वाढली.  जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५४८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३ हजार ४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३१ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून मृत्यू दर २.४१ टक्के आहे. 
जानेवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या एकदम घटायला लागली. 
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या अगदी अल्प होती. मात्र गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढायला लागली. त्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ५६५५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. भंडारा शहर काेरोनासाठी हॉटपॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात कुठेही नियमांचे पालन होत असल्याचे दिसून येत नाही. नागरिक विना मास्क भटकंती करीत आहे. गर्दीच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगचेही पालन होत असल्याचे दिसत नाही. यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे.

एसटीतील गर्दी ठरू शकते धोकादायक
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोना नियमांचे कुठेही पालन होत नाही. फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत बसमध्ये खचाखच प्रवासी भरले जातात. अनेकांच्या तोंडाला मास्क नसतात. अनेकदा तर चालक आणि वाहकही विना मास्कचे दिसून येतात. बसमध्ये सॅनिटायझरची कोणतीही सुविधा नसते. यामुळे एसटीतील गर्दी कोरोना वाढीसाठी धोकादायक ठरू शकते.

भंडारातील बार-रेस्टारंटवर कारवाई 
 शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी शहरातील विविध ठिकाणी या पथकाने धाडी मारून सहा बार-रेस्टारंटवर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. या पथकाने खात रोड, गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, बस स्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक आदी ठिकाणी भेटी देवून पाहणी केली.

 

Web Title: Most active corona patients in Bhandara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.