मोठ्या बाजार परिसरात सर्वाधिक वर्दळ, पायी चालायचे कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:32+5:302021-07-18T04:25:32+5:30
बॉक्स दररोज हजारो लोकांची ये-जा भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू ...
बॉक्स
दररोज हजारो लोकांची ये-जा
भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारे वाहनधारकही याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी बाजारातील गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र याकडे भंडारा नगरपरिषदेने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
बॉक्स
फूटपाथ कागदावरच...
भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फूटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून, रहदारीसाठी रस्ता अरुंद ठरत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
बॉक्स...
अतिक्रमण हटाव मोहीम गरजेची...
भंडारा नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक तसेच मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक व खात रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक मार्गांवरील दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे भंडारा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे.
बॉक्स
नगरपरिषदेचा हवा पुढाकार....
शहरातील विविध वाॅर्डात अनेक घरमालकांनी आपल्या घरासमोर असलेली जागा बांधून काढल्या आहेत. याव्यतिरिक्त आपल्या घरासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी कसरतीचे ठरत आहेत. त्यामुळे भंडारा नगरपरिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट
शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरुंद रस्त्यावरून जाताना कोणी आपल्याला धडक मारते की काय, असा भास होतो.
विवेक मेश्राम, भंडारा
कोट
भंडारा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे. वाहनधारकांनी एखाद्या विक्रेत्याला अथवा दुकानासमोर वाहन उभे केल्यास तात्काळ भांडणाला सुरुवात करतात. यासाठी दुकानदारांवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
मनोज बुरुडे, भंडारा