कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:42+5:302021-05-08T04:37:42+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ...
जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ९८, लाखनी तालुक्यातील ७८, साकोली तालुक्यातील ८८ आणि लाखांदूर तालुक्यातील ४२ व्यक्तींचा समावेश आहे. यात शहर भागातील ३७४ आणि ग्रामीण भागातील ३७७ व्यक्तींचा समावेश आहे. सध्या गावागावांत कोरोना लसीकरण सुरू आहे; परंतु ग्रामीण जनता अफवांना बळी पडून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
बॉक्स
सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील नागरिकांचे झाले आहे. या वयोगटातील २७७ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल ५१ ते ६० वयोगटातील २७३ जणांचा मृत्यू झाला. शून्य ते १० वयोगटात दोन, ११ ते २० वयोगटात दोन, २१ ते ३० वयोगटात २१, ३१ ते ४० वयोगटात ७७, ४१ ते ५० वयोगटात १६४, ७१ ते ८० वयोगटात १०७ आणि ८० च्या वरील २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विशेष म्हणजे महिलांपेक्षा मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
बॉक्स
शहरातील व्यक्ती लसीकरणासाठी खेड्यात
शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी असल्याने अनेक जण आता गावखेड्यात लसीकरणासाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहीम सुरू केली आहे; परंतु जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तेथे आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. ही बाब शहरी व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी आता लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. शहरी भागातील नागरिकांना लसीचे महत्त्व समजल्याने ते तत्काळ लस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर ग्रामीण भागात लसीकरणासाठी मनधरणी करूनही कुणी लस घेत नाही. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.