सर्वाधिक कोरोना रुग्ण ३१ ते ४० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:27+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार २११ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार सर्वाधिक रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहे. एकूण रुग्णाच्या १६४४ रुग्ण या वयोगटातील असून १०९३ पुरूष आणि ५५१ महिला आहेत. त्याखालोखाल २१ ते ३० वयोगटातील १५३० व्यक्तींना कोरोनाचा बाधा झाली. त्यात ८७२ पुरूष आणि ६५८ महिलांचा समावेश आहे.

Most corona patients are in the age group of 31 to 40 years | सर्वाधिक कोरोना रुग्ण ३१ ते ४० वयोगटातील

सर्वाधिक कोरोना रुग्ण ३१ ते ४० वयोगटातील

Next
ठळक मुद्देवृद्धांचे प्रमाण अल्प : एकूण रुग्णांच्या ६२.८० टक्के पुरूष तर ३७.२० टक्के महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा सात हजारा पार गेला असून यात सर्वाधिक रुग्ण ३१ ते ४० वयोगटातील आहेत. ८० वर्षावरील रुग्णांचे अत्यल्प प्रमाण आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या ६२.८० टक्के पुरूष तर ३७.२० टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्ग काळात तरूणाई बेफिकरीने वागत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार २११ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार सर्वाधिक रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहे. एकूण रुग्णाच्या १६४४ रुग्ण या वयोगटातील असून १०९३ पुरूष आणि ५५१ महिला आहेत. त्याखालोखाल २१ ते ३० वयोगटातील १५३० व्यक्तींना कोरोनाचा बाधा झाली. त्यात ८७२ पुरूष आणि ६५८ महिलांचा समावेश आहे. ४१ ते ५० वयोगटात १२७४ व्यक्ती पॉझिटिव्ह व्यक्ती असून त्यात ८५० पुरूष आणि ४२४ महिलांचा समावेश आहे. ५० ते ६० वयोगटात ११७५ व्यक्तींचा समावेश असून ७५३ पुरूष आणि ४२२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण २१ ते ६० या वयोगटातील आहेत. ६० ते ७० वयोगटात ६२७, ७१ ते ८० वयोगटात १७५ रुग्ण आढळून आले आहेत. ८० वर्षावरील ४३ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात महिलांच्या तुलनेत पुरूष रुग्णांची संख्या अधिक आहे. ४५८२ पुरूष आणि २७७४ महिला रुग्ण आढळून आले. पुरूषांची टक्केवारी ६२.८० तर महिलांची टक्केवारी ३७.२० आहे. जिल्ह्यात तरूण त्यातही पुरूष मंडळी सर्वाधिक बेफिकरीने वागत असल्याचे आतापर्यंतच्या कोरोना रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर आवश्यक आहे.

शुक्रवारी सहा मृत्यू, १०४ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात शुक्रवारी सहा जणांचा मृत्यू तर १०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर १४९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भंडारा तालुका ४३, मोहाडी १३, तुमसर १७, पवनी १६, लाखनी दोन, साकोली नऊ, लाखांदूर चार रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी सहा जणांचा मृत्यू झाला असून भंडारा व पवनी तालुक्यातील प्रत्येकी दोन तर साकोली आणि लाखनी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाने मृतांची संख्या १८५ झाली आहे.

शून्य ते १० वयोगटात २२६ रुग्ण
जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णात शून्य ते १० वयोगटात २२६ रुग्णांचा समावेश आहे. यात १२२ बालके आणि १०४ बालिकांचा समावेश आहे. या बालकांना निकट संपर्कामुळे कोरोनाची बाधा झाली असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर अधिक ८०.२० टक्के आहे.

Web Title: Most corona patients are in the age group of 31 to 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.