सरसकट नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:41 PM2017-11-05T21:41:33+5:302017-11-05T21:41:51+5:30

धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले.

The most demanding compensation compensation | सरसकट नुकसानभरपाईची मागणी

सरसकट नुकसानभरपाईची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले. शेतात कापलेले किंवा पेरणी केली असल्याचे उशिराने सर्व्हेक्षण कसे काय होणार असा आक्षेप घेऊन माजी सरपंच राजेश भेंडारकर व शेतकरी भास्कर भेंडारकर व शेतकºयांच्या नेतृत्वात येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. पाटील, तलाठी मन्साराम जुमळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना पाठविले.
मावा, तुडतुडा किडीमुळे धान पिकाचे सर्व्हेक्षणाकरिता स्थानिक प्रशासनाला आदेश दिले असता त्यांनी शेतावर जावून सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात केली असता ९५ टक्के शेतकºयांनी धान कापणी केल्यामुळे सर्व्हेक्षण कसे करायचे? आसगाव येथे ३५०० एकर शेतजमीन असून १४०० खातेदार शेतकरी आहेत. प्रत्येकांच्या धान शेतीत तुडतुडा कीड लागल्याने शेतकºयांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे उभ्या पिकांचा सर्वेक्षणाचा देखावा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. यावेळी विपीन बोरकर, आशिष ब्राम्हणकर, शेखर पडोळे, सतीश भाजीपाले, केवळराम सावरबांधे, यमन तरोणे, जगदीश उपथळे, जगदीश सावरबांधे, रोहित मेंढे, रजत मेंढे, जगू तरारे, दादाजी बन्सोड, मंगेश ब्राम्हणकर, किरण डोये, चंद्रशेखर पडोळे, राजेश कठाणे, कैलाश जिभकाटे, सुभाष सावरबांधे, पांडूरंग मेंढे आदी शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली.

Web Title: The most demanding compensation compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.