मातेने आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:42 PM2018-07-16T23:42:50+5:302018-07-16T23:43:10+5:30
भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाज सेविका मीरा भट यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाज सेविका मीरा भट यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, लेंडेझरी येथे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने मातृसुरक्षा व लोकसंख्या दिवस कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, लेंडेझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच दुर्गा उईके, गणेशपूर ग्रामपंचायतचे सरपंच मनीष गणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे उपस्थित होते. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष संदीप ताले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणातून केले. सरपंच दुर्गा उईक यांनी आदिवासी महिलांमध्ये आढळून येणाºया अंधश्रध्दा, व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्यावर भर दिला.
सरपंच मनीष गणवीर यांनी शासकीय योजना अंमलबजावणीत लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. शांतीदास लुंगे यांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजना, मातृवंदन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जननी शिशू सरक्षा कार्यक्रम इतयादी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते गरोदर व स्तनदा मातांना रक्तवर्धक व आरोग्यदायी औषंधाचे वाटप करण्यात आले. आदिवासी बहुल लेंडेझरी गावातील १२ वी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणाºया शारदा चौरे व आंचल उईके यांचा भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. मीरा भट यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मानव विकास शिबीरात ९१ गरोदर माता व ३९ स्तनदा मातांची ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुधा भूरे यांनी तर शुन्य ते २ वर्षाआतील ४९ बालकांची बालरोगतज्ञ डॉ. आशिष चिंधालोरे यांनी आरोग्य तपासणी करुन औषधोपचार केले.
यानिमित्ताने आरोग्य प्रदर्शनी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन आरोगय सहाय्यिक मंगला मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य सेविका ज्योती सार्वे यांनी केले. कार्यक्रमाकरीता डॉ. मेहबूब कुरेशी, गुरुदेव भोंडे, हरकासिंग मडावी, डॉ. प्राची ताले, डॉ. रेशमाराणी बारापात्रे, डॉ. तक्षशिला मेश्राम, डॉ.रश्मी ओहल, डॉ. प्रेषित गिरी,सुनिता पांडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला राजेश्वरी लांजेवार, छाया बर्वे, अंजू लांजेवार, आंचल मेश्राम, दिनकर राठोड, दामू सार्वे, श्रीकृष्ण घटाटे, उषा मेश्राम, भावना वासनिक, उषा चौरे, किशोर आडे, जमनादास जोशी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, लाभार्थी उपस्थित होते.