आईच्या कुशीपासून दुरावली ‘छकुली’

By Admin | Published: December 25, 2014 11:26 PM2014-12-25T23:26:46+5:302014-12-25T23:26:46+5:30

बालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. या वयातच मुलांना स्वच्छंदपणे खेळणेबागडणे आवडते. थकलेला बाळ आईच्या कुशीत दडला तर त्याला ऊर्जा मिळते. परंतु, खुटसावरीतील छकुलीच्या

Mother's hunchback 'Chakuli' | आईच्या कुशीपासून दुरावली ‘छकुली’

आईच्या कुशीपासून दुरावली ‘छकुली’

googlenewsNext

राजू बांते - मोहाडी
बालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. या वयातच मुलांना स्वच्छंदपणे खेळणेबागडणे आवडते. थकलेला बाळ आईच्या कुशीत दडला तर त्याला ऊर्जा मिळते. परंतु, खुटसावरीतील छकुलीच्या बाबतीत मात्र सगळे उलटेच घडले. दुर्देवी छकुलीचे पितृत्व हरपले अन् आई कारागृहात दृष्कृत्याची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे बालपणीच ती पोरकी झाली आहे.
लहानग्या वयात पित्याचे प्रेम आणि आईची कुस मिळावी. मात्र खुटसावरीत छकुलीच्या बाबतीत दुर्देवी घडले. आईच्या दृष्कृत्यामुळे छकुलीसाठी हा काळ वेदनादायी ठरत आहे. आजघडीला ही छकुली मोठ्या आईबाबांकडे पित्याची ममता व आईची कुस शोधत आहे. हे सगळे दुर्देव आले तीन वर्षाच्या छकुली (श्रेया) सरेंद्र धांडे हिच्या नशिबी.
पतीचा खून करताना आपले काय होईल. चिमुकल्या छकुलीचे काय होईल. असा थोडासाही विचार प्रीती धांडे या निर्दयी मातेला आला नाही. छकुली गावातीलच एका अंगणवाडीत जाते. आताही ती धास्तावली आहे. मातेच्या या दृष्कृत्यामुळे ती आईचा तिरस्कार करु लागली आहे. सुरेंद्रच्या खूनानंतर छकुलीची आई प्रीती धांडे हिला तपासातील संपूर्ण बारीकसारीक माहिती जाणून घेण्यासाठी खुटसावरीत आणले होते. राहत्या घरी तिला नेण्यात आले. छकुलीला बघून तिचे मन द्रवले. तिला आपल्या कुशीत घेण्यासाठी दोन्ही हात पुढे केले. परंतु, कोण जाणे छकुली आईकडे गेली नाही. काही वेळाने तिला दोन्ही हात मागे घ्यावे लागले.
२० दिवसांपासून छकुली मोठ्या आईबाबांकडे राहत आहे. तिचे मोहगावदेवीचे आजोबा नातनीच्या प्रेमापोटी खुटसावरीत आहेत. छकुलीच्या मोठ्या आईबाबांना मुले नाहीत. आता छकुलीच्या रुपात तिला आपली मुलगी बघत आहेत. मोठ्या आईच्या कुशीत बसून तिला आईपेक्षा जास्त प्रेम मिळू लागले आहे.
त्यांना अपत्य नसल्यामुळे तेही छकुलीवर जीवापाड प्रेम करीत आहेत. मोठ्या आईला मुलीचे प्रेम मिळू लागले आहे. आता आम्हीच तिचा संपूर्ण सांभाळ करणार असल्याचे छकुलीचे मोठे आईबाबा सांगून आईची सावलीही तिच्यावर पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. छकुलीचे पितृत्व तर कायमचे हरविले. माझ्या बाबांना मारले अशी छकुली सांगते. तीन आठवड्यापासून तिची आई कारागृहात पश्चाताप करीत आहे.
या घटनेत प्रिती धांडे हीच मुख्य सुत्रधार होती. हे सर्व करताना आपल्या बाळाचे कसे होईल याचाही तिने विचार केला नाही.
छकुलीचा पिता आईनेच हिरावून नेला. आता परत तिचा पिता येणार नाही. मातृत्व देणारे आईबाबा आता तिला मिळाले असतील तरी स्वत:च्या आईच्या कुशीतला विसावा लहान बालकांना सुसह्य करतो. परंतु, छकुलीला आता मोठ्या आईबाबांकडून मिळणार आहे.
पितृत्त्व हरपलेल्या मुलांसाठी पुढचे जीवन कसे असह्य होते, याचा प्रत्यय ज्यांना वडील नाहीत त्यांनाच ठाऊक आहे. खुटसावरीत त्या रात्री जे घडले त्याचा परिणाम अख्ख्या गावावर झाला आहे. संपूर्ण गाव आजही दहशतीत आहे. पहाटे आणि रात्रीही कुणी घराबाहेर पडत नाही.

Web Title: Mother's hunchback 'Chakuli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.