गुणवंत विद्यार्थ्यांच्या आईंचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:21+5:302021-09-27T04:38:21+5:30
बॉक्स असा असेल उपक्रम दहावीची प्रथम सराव परीक्षा २९ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. या पहिल्या परीक्षेत ९० टक्के अधिक ...
बॉक्स
असा असेल उपक्रम
दहावीची प्रथम सराव परीक्षा २९ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. या पहिल्या परीक्षेत ९० टक्के अधिक गुण घेणाऱ्या व प्रथम येणाऱ्या मुलींच्या आईंचा साडी व चोळी देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच मुलांमधून ९२ पेक्षा अधिक घेणाऱ्या मुलांच्या आईंना तोच सन्मान देण्यात येणार आहे. तसेच मुला-मुलींमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास भेट दिली जाणार आहे. तसेच ९० टक्के अधिक गुण घेणाऱ्या मुलांच्या आईंना भेटवस्तू दिली जाणार आहे.
कोट
विद्यार्थ्यांच्या यशात सर्वात मोठा वाटा आईचा असतो. बहुधा विद्यार्थ्यांचा मंचावर कौतुक व गौरव केला जातो. पण, त्या मागे अदृश्य असा आईचा पाठबळ व तेवढीच मेहनत असते. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सलाम आईंना करता यावा. अनेक आईंना लेक शिकली पाहिजे याची प्रेरणा मिळावी म्हणून उपक्रम हाती घेतला आहे.
राजू बांते
मुख्याध्यापक, महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी