मोरगाववासीयांचा तहसीलदारांसमोर ठिय्या आंदोलन

By Admin | Published: March 28, 2017 12:17 AM2017-03-28T00:17:55+5:302017-03-28T00:17:55+5:30

धान्य घोटाळा संबंधी तालुका प्रसिद्ध आहे. आता तर धान्य दुकानदारांनी घोटाळ्याचा उच्चांक गाठला आहे.

A motion movement in front of the Tahsildar of the Morganas | मोरगाववासीयांचा तहसीलदारांसमोर ठिय्या आंदोलन

मोरगाववासीयांचा तहसीलदारांसमोर ठिय्या आंदोलन

googlenewsNext

‘त्या’ गावात मृत व्यक्तीही उचलतो शिधापत्रिकेवर धान्य : लग्नाविना झाली पत्नी, एकाच नावाने दोन कार्ड, अनेक बोगस कार्ड
मोहाडी : धान्य घोटाळा संबंधी तालुका प्रसिद्ध आहे. आता तर धान्य दुकानदारांनी घोटाळ्याचा उच्चांक गाठला आहे. मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात एका वर्षापासून दोन मृत झालेले व्यक्ती शिधापत्रिकांवर धान्याची उचल करीत आहेत. तसेच काही काल्पनिक नावाच्या शिधापत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. गावाची लोकसंख्याही वाढवून घेतली असल्याचे प्रकरण आज तहसील कार्यालयात मोरगाववासीयांनी लावून धरले. तहसीलदारासमोर ठिय्या आंदोलन झाले. अखेर तहसीलदारांनी नमते घेवून मोरगावचा धान्य दुकान मोहाडी येथे जोडला. तसेच तात्काळ चौकशी समिती गठीत करून आजच अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले.
मोहाडी नजीक असलेल्या मोरगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. महालगाव येथील मनिषा सिद्धार्थ रामटेके स्वस्त धान्य दुकान चालवितात. स्वस्त धान्य दुकान चालवितानी त्यांनी अनियमितता केली. यासंबंधी मोरगाव येथील काही व्यक्तींनी तहसील कार्यालयात माहिती अधिकार घातला. माहिती अधिकारातून तहसीलदारांनी माहिती दिशाभूल करणारी दिली. तिथूनच मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात बऱ्याच भानगडी असल्याचा संशय बळावला. त्यानंतर ज्या काही बाबी उघडकीस आल्या. मोरगाव येथील गावाची लोकसंख्या ५९० आहे. पण शिधापत्रिकेच्या आकड्यात त्या गावची लोकसंख्या १०६९ असल्याचे दिसून आले. मोरगावात बीपीएल कार्डधारक १२६ त्यांची लोकसंख्या ६७५, अंत्योदय कार्डधारक ५६ लोकसंख्या ११०, एपिल कार्डधारक ७९ लोकसंख्या २७१, शुभ्र कार्डधारक ५ व लोकसंख्या १३ आहे. त्या गावात ४७९ अधिकची लोकसंख्या कुठून जुळवून घेण्यात आली. अंत्योदय मध्ये ५६ कार्डधारक आहेत म्हणजे एका कार्डामागे २ व्यक्ती येतात. ५६ शिधापत्रिकाधारकांमध्ये दोनच नावे म्हणजे कुटुंब प्रमुख व पती असेच समाविष्ट असतील तर त्या घरची मुले गेली कुठे? अंत्योदय ५६, बीपीएल १२६ यानुसार दरमहा धान्याची उचल केली जाते. प्रत्यक्षात १२ अंत्योदय व ६० बीपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाते. उर्वरीत धान्य कुठे जातो असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. मोरगावात एकाच व्यक्तीची डी - १ मध्ये २ ते ३ वेळा नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पती पत्नीचे वेगवेगळे शिधापत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. डी-१ मध्ये गोरखनाथ भुते, सोमाबाई नत्थू शेंडे, शिवराम सोमा अतकरी, मिराबाई श्रीकृष्ण बोरकर, सरस्वता धनराज शेंडे, सुशिला बाजीराव डोंगरे अशी काल्पनिक असलेल्या नावाच्या शिधापत्रिका तयार करून धान्याची उचल केली गेली. एवढेच नाही तर एका वर्षापूर्वी हरिभाऊ मुका बोरकर, सारुबाई दलपत भोयर यांचे मृत्यू झाले आहे. या मृत व्यक्तींचीही नावे डी - १ मध्ये समाविष्ठ आहेत. एवढेच नाही तर त्या मृत व्यक्तींच्या नावे दर महिन्याकाठी धान्याची उचल केली जाते. वडीलांचे नाव बीपीएलमध्ये तर कुमारिका असलेली सरिता हारगुळे हिचे नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत घालण्यात आले आहे. यापुढे जावून सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी लग्नापूर्वीच एका रेशमा नावाच्या मुलीला पत्नी बनवून रवी ढबाले यांचे शिधापत्रिकात लग्न लावून दिले. त्यानुसार धान्याची उचलही केली गेली. अंत्योदय योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत या दोन्ही योजनेत जकुबाई बळीराम भुते, सकुबाई शामराव भुते, कामुना सोमा भुते या महिलांची नावे समाविष्ट आहेत. पण आपले नाव त्या योजनेत आहे. याचा थांगपत्ताही महिलांना नाही. या तक्रारी संबंधात मोरगाववासीयांनी तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या दालनात घेराव घातला होता. प्रारंभी ३ मार्च रोजी या समस्यांची चौकशी करून माहिती देण्यात येईल असे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. वेळ मारून नेण्याचा बेत मात्र मोरगाववासीयांनी हाणून पाडला. तात्काळ दुकान काढून घ्या, चौकशी करा या मागणीसाठी महिलांसह पुरुषांनी तहसीलदाराच्या दालनातच ठिय्या मांडला. अखेर गावकऱ्यांचा रोष व संताप अनावर होताच. तहसीलदार व त्याच्या प्रशासनातील कारकून यांनी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. अखेर मोहाडी येथील राजू बावणे यांच्या दुकानाला मोरगावची दुकान जोडण्याचे घोषित केले. तसेच तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर प्रकरण थंड झाले. गावकरी आपल्या गावी परतले ते चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना घेऊनच. वृत्त लिहिपर्यंत मोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी सुरु होती. तहसीलदार यांनी नायब तहसीलदार हरिभाऊ थोटे, अन्न निरीक्षक राहुल वानखेडे, सागर बावरे व कोतवाल चंदन नंदनवार यांची चौकशी समिती नेमली. तात्काळ चौकशीला जावून अहवाल आजच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.बनावट शिधापत्रिका तहसीलमधून तयार करण्यात आल्या आहेत. असा आरोप करून अन्न विभागातील कारकुनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

तहसीलदार भडकले
गावकऱ्यांनी तेच तेच प्रश्न विचारून तहसीलदाराचे डोके फिरविले. त्यामुळे तहसीलदार देशमुख भडकले. त्याला प्रतिउत्तर गावकऱ्यांनी चिडून जावून दिले. आमचा आवाज दाबता काय? असा प्रश्न विचारून गोंधळ घातला. थोडावेळ तहसीलदारांच्या दालनात काय झाले म्हणून अनेकांनी तिथे धाव घेतली होती.

प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही. नियमानुसार तीन दिवसात चौकशी होवून स्वस्त दुकानदार दोषी आढळला तर कठोर कारवाई करू.
-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.

Web Title: A motion movement in front of the Tahsildar of the Morganas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.