राज्य मार्गावरील शाळांसमोर हवेत गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:02 PM2018-03-31T23:02:58+5:302018-03-31T23:02:58+5:30

भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

Movement in the air in front of schools on the state road | राज्य मार्गावरील शाळांसमोर हवेत गतिरोधक

राज्य मार्गावरील शाळांसमोर हवेत गतिरोधक

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बांधकाम विभागाने सूचना फलकही लावलेले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. तथापि, बांधकाम विभाग बालकांचे जीव घेण्याची प्रतिक्षा करीत आहे का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
राज्य मार्गावरच्या शाळा अपघात प्रवणस्थळ बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही. चार दिवसापूर्वी नवस फेडायला आलेल्या बालकाचा दहेगाव येथे मृत्यू झाला. कदाचित गतिरोधक असता तर त्या बालकाचा जीव वाचू शकला असता. दहेगाव येथील पाटीलबाबा मंदिरासमोर अंगणवाडी, जिल्हा प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयही आहे. प्राथमिक शाळेचे आवार मोठे असल्याने गावातील सर्व सामूहिक कार्यक्रम तिथेच होतात. सकाळ झाल्यापासून विद्यार्थी, पालक व अनेकांना रस्ता ओलांडावा लागतो. परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.
मोहगावदेवी येथील टोलीवरही अंगणवाडी, प्राथमिक शाळा तसेच महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळा आहे. येथेही बालकांना रस्ता पार करून शाळा गाठावी लागते. बोथली येथील प्राथमिक शाळा, मोहाडी येथील सरस्वती कन्या विद्यालय या शाळेसमोर गतिरोधक नाही. भंडारा-तुमसर राज्यमार्गावरून वाहने वेगाने धावत असतात. भरधाव वाहनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोथली, मोहगावटोली, दहेगाव या ठिकाणी अपघात झाले आहेत. काही जणांचे जीव गेले तर काहींना जखमी व्हावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभाग बालकांच्या जिवांची पर्वा करीत नसल्याचे दिसून येते.
राज्य मार्गावरच्या शाळांमधील बालक सुरक्षित नाहीत. कारण, पुढे शाळा आहे, असे संकेत देणारे सूचनाफलक कोणत्याही शाळेसमोर नाही. सूचना देणारे फलक असते तर संवेदनशिल वाहक वाहनाचा वेग कमी करतात.
सार्वजनिक बांधकाम खात्याने शाळांशेजारी सूचना फलक लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. मोहगाव टोली, बोथली, वरठीचा टी-पाइंट या ठिकाणी एक वर्षापूर्वी प्लॉस्टिकचे गतिरोधक लावण्यात आले होते. हे गतिरोधक दोन महिन्यात उखडून गेले. आता ते दिसतही नाही. यावर लावलेला खर्च वाया गेला. त्यामुळे कायम टिकतील असे गतिरोधकाची गरज आहे.

शाळेतून मुलगा घरी येईपर्यंत काळजी करणाऱ्या आईबाबांची संवेदना लक्षात घेऊन बांधकाम विभागाने शाळांसमोर गतिरोधक व सूचना फलक लावावे.
- राजेश लेंडे, माजी सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवी.

Web Title: Movement in the air in front of schools on the state road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.