केंद्र,राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:44 PM2018-04-01T22:44:59+5:302018-04-01T22:44:59+5:30
शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारला सकाळी १० वाजता गांधी चौक भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारला सकाळी १० वाजता गांधी चौक भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
देशातील जनतेला भुलथापा देऊन सरकाने एप्रिल फुल बनविले आहे. ही सरकार शेतकºयांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे. त्यांचे कर्ज माफ झालेले नाही. बेरोजगारांना वर्षाला दोन कोटी नोकºया देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र बेरोजगार लोकांना अद्यापर्यत नोकºया दिल्या नाहीत. याउलट सरकारकडून नोकरी वरून काढले जात आहे. जेव्हापासून भाजप शासन सत्तेत आली तेव्हापासून महागाई वाढत आहे. सिल्डििंरचे दर दुपटीने वाढले आहे. गोड तेलाच्या तेलाच्या किमती, पेट्रोल, डीजलचे दर गगनाला भिडलेले आहेत. या सरकारने गरीब व कष्टकरी लोकांचे जगणे कठिण केले आहे. गरीब, सामान्य लोकांची तिजोरी खाली करून मोठ्या उद्योगपतींना हाताशी धरुन तिजोरी भरण्याचे काम सरकार करीत आहे. गरीब जनतेला एप्रिल फुल बनवीत आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरुध्द तीव्र रोष व्यक्त केला.
आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव शिशीर वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शहराध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रेम वनवे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजकुमार मेश्राम, माजी नगरसेवक धनराज साठवणे, अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष अवैश पटेल, महिला काँग्रेस अध्यक्षा भावना शेंडे, युवक अध्यक्ष कमलेश बाहे, विनीत देशपांडे, रिजवान काजी, सुहास गजभिये, पृथ्वी तांडेकर, सुरेश गोन्नाडे, जीवन भजनकर, घनश्याम भांडारकर, बंडू लांबट, अंबादास मंदुरकर, शमीम पठान, भारती लिमजे, पराग खोब्रागडे, सचिन हुमणे, विपुल खोब्रागडे, मयूर गजभिये, इरफान पटेल, मोहिश कुरेशी, निखिल कुंभलकर, प्रवीण भोंदे, मेहमूद खान, शांतनु मोहिते, अमय डोंगरे, विलास मोथरकर, संजय वरगंटीवार, जनार्दन निंबार्ते, रविकुमार येरकडे, घनश्याम भांडारकर, जगदीश कडव, रविंद्र पुडके, रामेश्वर मते, गौतम नागदेवे, नागन खोब्रागडे, दीपक गजभिये, वर्गनाथ गोन्नाडे तसेच शहरातील मजूर वर्ग, बेरोजगार युवक, शहरातील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.