संघर्ष वाहिनीचा ‘दे धक्का’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:39 PM2018-06-15T22:39:23+5:302018-06-15T22:39:32+5:30

‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Movement of 'De Dhakka' movement of the struggle | संघर्ष वाहिनीचा ‘दे धक्का’ आंदोलन

संघर्ष वाहिनीचा ‘दे धक्का’ आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले.
हा मोर्चा लायब्ररी चौक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. भटक्या विमुक्त जाती जमाती व मच्छिमार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा शासनाला निवेदने देण्यात आली. त्यावर शासनाने आश्वासनांपलिकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. या समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जमातींना स्वतंत्र १३ टक्के आरक्षण देण्यात यावे, लोकसंखेच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, नागपूर येथे सप्टेबरमध्ये काढलेल्या मोर्चात मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, तलावातील गाळ उपसून तलावावर होत असलेला अतिक्रमण काढण्यात यावा, महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १६८ नुसार मासेमारीच्या हक्काची महसुल अभिलेखात नोंद करण्यात यावी, संस्था नोंदणीत होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात यावा, माजी खासदार स्व.जतीरामजी बर्वे यांनी निर्माण केलेल्या विदर्भ मच्छिमार संघाचे पुनर्निर्माण करून मच्छिमारांचा रोजगारांचा प्रश्न सोडविण्यात यावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वस्तीगृहांची व्यवस्था करण्यात यावी, भटक्या समाजातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दयावा, अतिक्रमित घर जमीन व शेत जमिनीचे पट्टे भोगवटदारांच्या नावावर करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात नागपूरचे शंकरराव पुंड, संघर्ष वाहिणीचे तालुका संयोजक लोकेश नगरे, के.एन.नान्हे, रूपेश वासुदेव भानारकर, जनार्धन खेडकर, मासेमार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पचारे, कृष्णा केवट, सुनील शिवरकर, गोविंद मखरे, सुरेश खंगार, मनोज केवट, महादेव मेश्राम, सुभाष उके, महागु खंगार, नरेश वाघमारे, नरेश नान्हे, प्रभू केवट, ईसराम दिघोरे, बळीराम मेश्राम, दिवारू शेंडे, फागो मेश्राम, ज्ञानेश्वर केवट, श्रीराम मानकर, अरुण मांढरे, गजानन कागदे, कंसलाल चंदनबटवे यांच्यासह संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदचे पदाधिकारी, मासेमार समाज, भटके विमुक्त समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Movement of 'De Dhakka' movement of the struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.