इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:27 AM2017-04-15T00:27:20+5:302017-04-15T00:27:20+5:30
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे अधीक्षक अभियंता भंडारा कार्यालयासमोर संघटनेचे धरणे,....
वीज कार्यालयासमोर ठिय्या : आयटकच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
भंडारा : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे अधीक्षक अभियंता भंडारा कार्यालयासमोर संघटनेचे धरणे, साखळी उषोपणाची नोटीस ठवरे आणि राहांगडाले या कर्मचाऱ्याबाबत हेतूपुरस्सर आरोप लावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कार्यकारी अभियंत्यांनी केली. त्यामुळे झोनल सचिव विजय चौधरी यांनी नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने आंदोलन सुरु करण्यात आले होते. परंतु संघटनेला विश्वासात न घेता उडवाउडवीचे धोरण राबवुन चर्चेचे पत्र उशिरा दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना गेटवरच थांबवून आधी आमच्याशी चर्चा करा मग काम करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी संघटन प्रतिनिधी सोबत केलेल्या चर्चेत आयटकचे जिल्हाध्यक्ष हिवराज उके, कंत्राटी सेलचे राज्यप्रमुख नंदकिशोर भट, झोनल अध्यक्ष पी. डी. पवार, झोनल सचिव विजय चौधरी, सर्कल सचिव राजेश जांगडे उपस्थित होते.
संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाली व ठवरे आणि राहगंडाले यांनी अपील सादर करताच १५ दिवसात सर्व बाबीची उकल करुन योग्य निर्णय संघटनेसोबत पुन्हा चर्चा करुन घेण्याचे लेखी आश्वासन दिले. नंतर सदरचे धरणे, साखळी उपोषण स्थागित करण्यात आले. १५ दिवसात प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास हीच नोटीस समजून पुन्हा आंदोलन करु अशी भूमिका घेतली.
चर्चेनंतर विभागीय कार्यालयासमोर बैठक घेऊन उपस्थित वर्कर्स फेडरेशनच्या सभासदांना संबोधित केले. राज्यव्यापी एक दिवसीय रजा आंदोलन स्थगित झाल्याचे नंदकिशोर भट यांनी सांगितले.
आंदोलनकरीता एस.जी. पेठे, तारीक शेख, सुशील राहंगडाले, रविंद्र ठवरे, ईश्वर गोखले, सचिन झलके, सतीश उके, उमेश शेंडे, कोहळे, मदनलाल देशमुख, चावरे, जी.टी. मुंगुलमारे, किरणापुरे, कांबळे, ब्राम्हणकर, पेशकार जनई, कोटरंगे, दुपारे, चंद्रशेखर काकडे, के.टी. गभने, चौधरी, गुमडेलवार, एम.जी. खरात, बी. बी. मुंगुलमार, साखरकर, झंझाड यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)