भंडारा-पवनी राज्यमार्गाच्या दुरूस्तीसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:13 PM2018-11-30T23:13:55+5:302018-11-30T23:14:18+5:30
भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भंडारा नजिकच्या कारधा येथून पवनीकडे जाणाºया राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून, तब्बल ४२ किमीचा हा मार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे या मार्गावर अपघात वाढले असून, काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पवनी ते भंडारा पर्यंत या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून जवळपास २८० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. परंतु, मागील चार वर्षात संबंधित कंत्राटदार कंपनीच्या वतिने कामात हयगय केली जात आहे. नादुरूस्त रस्त्यावर केवळ मुरूम टाकून लिपापोती केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी पहेला येथे माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करून पवनी ते भंडारा या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. रस्त्याच्या दुरूस्तीचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. परिणामी, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. आंदोलकांशी चर्चा करीत लवकरच या मार्गाची दुरूस्ती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आठवडाभरात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, प्रेमानंद नखाते, राजू थोटे, दयानंद नखाते, अमोल भुरले, शरद फेंडर, सरपंच सुनिल शेंडे, उपसरपंच अनिल गिरडकर, गणेश वैद्य, मदन भुरले, विष्णू दहिवले, रवी आजबले, विनोद भोयर, राजू हलमारे, अन्ना टिचकुले, मयूर लांजेवार, आकाश बांते, प्रज्वल कांबळे, सागर वैद्य, रंजित बोरकर, घनश्याम बागडे, शंकर मडावी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.