शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:20 PM2017-09-04T22:20:40+5:302017-09-04T22:20:57+5:30

जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी ....

The movement of the Shiv Sena | शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी आणि सर्व तालुकास्तरावर तालुका भूमीअभिलेख अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज सोमवारला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी हे पद रिक्त आहे. तसेच या पदावर गडचिरोलीचे भूमी अभिलेख अधिकारी दाबेराव हे प्रभारी म्हणून आहेत. याशिवाय तालुका भूमी अभिलेख अधिकारी काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांच्याकडे आणखी दोन तालुक्यांचा अतिरिक्त कारभार होता. अजूनही या ठिकाणी नवीन अधिकाºयांची नेमणूक झालेली नाही. जिल्ह्यातील ऊर्वरित तालुक्यामध्येही अधिकारी नाहीत.
एकीकडे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला चार कोटीहून अधिक महसूल प्राप्त होतो, असे असतानाही जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील पदे रिक्त आहेत. त्याचा फटका थेट शेतकºयांना बसत आहे. त्यांची कामे वेळेवर होत नाही त्यांना कार्यालयात पायपीट करावी लागत आहे.
याला संतापून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेऊन कार्यकर्त्यांसह नारेबाजी करत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नागपूर येथील संचालक, उपसंचालक यांच्याशी चर्चा केली असता एक महिन्याच्या आत अधिकारी नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी जिल्हा उपप्रमुख संजय रेहपाडे, उपसभापती ललित बोन्द्रे, अनिल गायधने, शहरप्रमुख सुर्यकांत इलमे, यशवंत सोनकुसरे, विजय काटेखाये, बाळूभाऊ फुलबांधे, मुकेश थोटे, मयूर लांजेवार, राजू ब्राह्मणकर, जितेश इखार, गणेश मुडले, प्रकाश पारधी, यशवंत टिचकुले, राजू थोटे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: The movement of the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.