शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:21+5:302021-07-14T04:40:21+5:30
भंडारा : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत दिशानिर्देश दिले ...
भंडारा : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत दिशानिर्देश दिले आहेत. मात्र, आता शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना महाविद्यालय का सुरू करण्यात येत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या संदर्भाने आता महाविद्यालयामध्येही चर्चा होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील शाळा उघडाव्यात की नाही यावर विचारमंथन सुरू असताना उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्या संबंधाने कार्यही सुरू आहेत. गतवर्षीच्या सत्रात कोरोना संसर्गाच्या सावटात महाविद्यालय सुरू झाली होती.
प्राचार्यांची तयारी
कोरोना नियमांचे पालन करून महाविद्यालये उघडण्याबाबत विचार करायला हरकत नसावी. गत सत्रात महाविद्यालय परिसर निर्जंतुकीकरण करण्यासोबत कोविड १९ ची जनजागृतीवरही भर देण्यात आला. यात मास्कचा वापर, परिसर स्वच्छता आणि सॅनिटाइजरच्या वापरावर भर देण्यात आला होता.
- डॉ. विकास ढोमणे,
प्राचार्य, जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा
बॉक्स -
कोरोना काळाच्या सावटात शाळा सुरू होणार असल्या तरी अनेक तांत्रिक बाबी त्यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. तशीच काळजी महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात असावी, अशी चर्चा रंगली आहे. यावर शासन काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
-
महाविद्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण
विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरी धोरणाबाबत काळजी घेण्यात येत होती. अनेक महाविद्यालयांनी परिसर निर्जंतुकीकरणही केले होते. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक व पालकांनाही नियमावलीबाबत दिशा निर्देश दिले होते. आता शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, महाविद्यालयेही सुरू करण्यात यावीत असा सूर विद्यार्थ्यांमध्येही व्यक्त करण्यात येत आहे.