रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:53+5:30

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले.

MP-MLA face to face on railway line issue | रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

Next
ठळक मुद्देजवाहरनगर ते वरठी रेल्वे मार्ग : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पाठविले पत्र, तीस वर्षापासून वापरात नाही रेल्वे लाईन

आमदारांनी रेल्वे रुळ उखडण्याचे काम थांबविले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रेल्वे स्टेशनपर्यंत असलेले रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील खात रोडवरील सदर काम थांबविले. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यावर अन्याय असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

खासदार म्हणतात, हा निर्णय जुनाच
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत ३० वर्षापासून वापरात नसलेली रेल्वे लाईन काढून टाकण्याचा निर्णय हा रेल्वे विभागाचा असून तो जुनाच आहे. मात्र काही लोक त्याचा संबंध माझ्याशी जोडू पाहत आहे. अशांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे असा सल्ला खासदार सुनील मेंढे यांनी दिला.
जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रोड रेल्वे स्टेशन ही १३ किमीची लाईन १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. आॅर्डनन्स फॅक्टरीला लागणारा कच्चा माल आणण्यासाठी व उत्पादीत माल पाठविण्यासाठी भारतीय रेल्वेने ही सोय करून दिली होती. परंतु संरक्षण खात्याने या रेल्वे मार्गाचा उपयोग १९९० पासून बंद केला. तेव्हापासून रेल्वेच्या जागेचा दुरुपयोग व मालमत्तेचा नुकसान होत आहे. हे जुने रेल्वे रुळ कालबाह्य झाले असून वापरण्याजोगे राहिले नाही. मालमत्तेचा दुरुपयोग व नुकसान टाळण्यासाठी रेल्वे लाईन काढून घेण्याचे रेल्वेने २०१३-१४ मध्ये ठरविले होते. तो निर्णय यावर्षी अंमलात आला.
काही जण विनाकारण राजकारण करुन स्वत:ला चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांनी वस्तुस्थिती जाणून व अभ्यास करुन बोलावे, आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये असे ते म्हणाले.

Web Title: MP-MLA face to face on railway line issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे