पटोलेंविरोधात खासदार सुनील मेंढे यांची भंडारा ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 09:43 PM2022-01-17T21:43:01+5:302022-01-17T21:43:28+5:30

Bhandara News पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करीत त्यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याविरोधात सोमवारी भंडारा ठाण्यात खासदार सुनील मेंढे यांनी तक्रार दिली.

MP Sunil Mendhe's complaint against Patole at Bhandara police station | पटोलेंविरोधात खासदार सुनील मेंढे यांची भंडारा ठाण्यात तक्रार

पटोलेंविरोधात खासदार सुनील मेंढे यांची भंडारा ठाण्यात तक्रार

Next

भंडाराः पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करीत त्यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याविरोधात सोमवारी भंडारा ठाण्यात खासदार सुनील मेंढे यांनी तक्रार दिली. पटोले यांच्या प्रचारसभेतील वक्तव्यामुळे आमच्या व समाजातील सर्व लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करुन कारवाई झाली नाही तर जनक्षोभ निर्माण होईल असेही यात म्हटले आहे.

काय आहे  या  व्हिडिओत? 

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे खळबळजनक वक्तव्य केलेला व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या गृहमतदारसंघात जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, मी का भांडतो. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षांत आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी हे माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते,’ असे नाना पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.

 

 

 

Web Title: MP Sunil Mendhe's complaint against Patole at Bhandara police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.