बंगालमधील हिंसाचाराचा खासदारांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:15+5:302021-05-06T04:37:15+5:30
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यालयांवर हल्ले करणे सुरू केले. या हिंसाचारात ...
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यालयांवर हल्ले करणे सुरू केले. या हिंसाचारात अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा जीव गेला. अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. भाजपासह अन्य समविचारी संघटनाच्या कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली. मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे वास्तविक रूप पुन्हा पुढे आले आहे. सत्तेत येताच सुरू झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुका व प्रमुख ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून हातात फलक घेत निषेध करण्यात आला. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी निषेध या घटनेचा निषेध करत दोषींना शिक्षा व्हावी व हिंसाचार थांबत नसेल तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.