तुमसरच्या पर्यायी भाजीबाजारात चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:27+5:302021-07-28T04:36:27+5:30
नेहरू क्रीडांगणाजवळच घाऊक भाजीविक्रीची दुकाने लावण्यात येतात. नगर परिषद प्रशासनाने त्यांना तलाव परिसरात जागा उपलब्ध करून दिली; परंतु नेमून ...
नेहरू क्रीडांगणाजवळच घाऊक भाजीविक्रीची दुकाने लावण्यात येतात. नगर परिषद प्रशासनाने त्यांना तलाव परिसरात जागा उपलब्ध करून दिली; परंतु नेमून दिलेल्या जागेवर ते बसत नाहीत. क्रीडांगणाजवळ व्यवसाय करातात. भाजी घेऊन येणारी जड वाहने मैदानातून ये- जा करतात. त्यामुळे मैदानावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचून राहते. सध्या मैदानावर जिकडेतिकडे चिखल दिसून येतो. या मैदानावर पोलीस भरती, सैन्य भरती व इतर खेळाडू सध्या सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून मैदानावरील चिखल व खड्ड्यात मुरूम घालून खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी क्रीडापटूंनी केली आहे.
क्रीडांगणाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. क्रीडांगणाला असलेले प्रवेशद्वार बंद करावे व क्रीडांगणातून भाजीच्या जड वाहतुकीच्या वाहनांना बंदी घालून दंड वसूल करावा, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रीडापटूंनी केली आहे.