चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:16 PM2018-07-02T23:16:16+5:302018-07-02T23:16:35+5:30
तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यातील चिखला येथे वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्याकरिता त्याला एका वाहनातून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन गृहापर्यंत वाहनाला जातानी अडचण निर्माण झाली. मृतकाचे नातेवाईक, आप्तस्वकीय व लोकप्रतिनिधी रुग्णालयात आले होते. सांत्वन देण्याकरिता मृतकाच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता शवविच्छेदन गृहाकडे त्यांना रस्त्यामुळे जाता आले नाही. उपजिल्हा रुग्णालयातील मागील भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
शवगृहाकडे जाणारा रस्ता चिखलमय असून निसरडा आहे. वाहनाने जातानी धोक्याची अधिक शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाने येथे दुर्लक्ष दिसत आहे. शवविच्छेदन गृहाकडे जातानी संबंधित डॉक्टर्स इतर कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यासंबधी येथील वैद्यकीय अधिकाºयांना माहिती असली तरी या विषयी पाठपुरावा का करण्यात येत नाही, असा सवाल आहे.
चिखलमय रस्त्यावर मुरूम घालण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेण्याची गरज आहे. सुमारे अडीच लक्ष नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रशासनासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून अस्वच्छता आहे. शवविच्छेदन गृहाकडे मी रविवारी जाऊ शकलो नाही. रस्ता चिखलमय आहे. रुग्णालय प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
-के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य भंडारा.