भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चाचा ‘मूक मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:48 AM2018-08-03T00:48:38+5:302018-08-03T00:49:10+5:30

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत.

'Mumba Morcha' of OBC Kranti Morcha at Bhandara | भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चाचा ‘मूक मोर्चा’

भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चाचा ‘मूक मोर्चा’

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राष्ट्रीय मागासवर्ग आयोग गठित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत. परिणामी ओबीसींसाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग गठित करुन अहवाल प्राप्त होईपर्यंत अन्य मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.
गुरुवारी दुपारी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री यांच्या नावाने असलेले प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले. यात ओबीसी समाजाला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, संसदेने घटना दुरुस्ती करुन सुप्रीम कोर्टाने आरक्षणावर लावलेली ५० टक्क्याची मर्यादा काढण्यात यावी, ओबीसी मागासवर्गीय असल्यामुळे ओबीसी नागरिकांविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करु नये, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एसटी प्रमाणे सवलती देण्यात यावा, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींकरिता केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, स्वयंरोजगार-लघुउद्योग करणाºया ओबीसींना ३६ टक्के सबसीडी देण्यात यावी, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात यावी, ओबीसी शेतकºयांना शेतीचे अवजारे, बी-बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करावा व ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी ओबीसी क्रांती मोर्च्याचे संजय मते, सुकराम देशकर, प्रमोद भांडारकर, शिशुपाल भुरे, उमेश मोहतुरे, सतीश सार्वे, जयश्री बोरकर, प्रविण उदापुरे, उर्मिला आगाशे, देवेंद्र गावंडे, सुभाष आजबले, अरुण भेदे, संजय लोंडेकर, बालु ठवकर, धनराज साठवणे, मयुर बिसेन, विकास मदनकर, प्रेमसागर गणविर, डॉ. विनोद भोयर, सचिन घनमारे, दिनेश नवखरे, शिवा गायधने, चेतन चेटुले, यशवंत भोयर, रजनिश मेश्राम, जयंत बोटकुले, अमोल चोपकर, विजय चटफ, मारोती राऊत आदी उपस्थित होते.
ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेची स्थापना
ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेची स्थापना करण्यात आली. लवकरच राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरावर कार्यकारिणी गठीत करण्यात येईल असे संयोजक संजय मते यांनी सांगितले.

Web Title: 'Mumba Morcha' of OBC Kranti Morcha at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.