भर पावसात मुंबईच्या तज्ज्ञांनी केली उड्डाणपुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:25+5:302021-07-09T04:23:25+5:30

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलाचे ...

Mumbai experts inspect the flyover in heavy rains | भर पावसात मुंबईच्या तज्ज्ञांनी केली उड्डाणपुलाची पाहणी

भर पावसात मुंबईच्या तज्ज्ञांनी केली उड्डाणपुलाची पाहणी

Next

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलाचे बांधकाम केले. सदर पुल दगडी असून पुलाच्या दोन्ही बाजूला राखेचा भराव करण्यात आला. पावसाळ्यात पूलातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघाली. त्यामुळे पूलाच्या ॲप्रोच मार्गावर खड्डे पडले होते. पूलातून राख बाहेर का निघत आहे, याकरिता बांधकाम विभागाने दिल्ली व मुंबईच्या तज्ज्ञांना पूलाच्या निरीक्षणासाठी बोलाविले होते. यापूर्वी दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक येऊन उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यानंतर गुरुवारी मुंबई येथील पथक येऊन त्यांनी पुलाचे निरीक्षण केले.

बॉक्स

आउटलेट दाखवा

मुंबई येथील तज्ज्ञांनी स्थानिक प्रोजेक्ट अभियंता व कंत्राटदाराला आउटलेटबाबत विचारणा केली. ठराविक अंतरानंतर उड्डाणपुलाला आउटलेट असणे गरजेचे आहे. आउटलेटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास पाण्याचा निचरा होत नाही. त्यात अडचण निर्माण होते. संपूर्ण आउटलेट दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे आउटलेटमधील पाणी पुलांमध्ये शिरून पूल कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. सदर आउटलेट ठराविक अंतरावर आहे किंवा नाही याची माहिती विचारून आउटलेट दाखविण्याची निर्देश दिले. दरम्यान येत्या पंधरवड्यात या पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू होत आहे. त्यामुळे निरीक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Mumbai experts inspect the flyover in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.