तुमसरात शिक्षकांचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:26 AM2017-12-19T00:26:29+5:302017-12-19T00:26:49+5:30

शासनाने पेंशन बंद केल्याने शिक्षकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. तो शिक्षक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे.

Mundran movement of all teachers | तुमसरात शिक्षकांचे मुंडण आंदोलन

तुमसरात शिक्षकांचे मुंडण आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाचा निषेध : जुनी पेंशनची मागणी

आॅनलाईन लोकमत
तुमसर : शासनाने पेंशन बंद केल्याने शिक्षकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. तो शिक्षक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे. जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क मुंडन करून शासन व प्रशानाचे लक्ष वेधले.
१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर लागलेल्या शिक्षकांची पेंशन शासनाने बंद केली आहे. शिक्षण क्षेत्र प्रगतीकरिता शिक्षकांना परिश्रम करावे लागते. त्या शिक्षकांची पेंशन शासनाने बंद केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जुनी पेंशन लागू करण्यासाठी शिक्षक झटत आहेत. जुनी पेंशन हक्क संघटना निर्माण करून तुमसर तालुक्यातील शिक्षकांनी अभिनव शासनाचा निषेध केला आहे.
मुंडण करणाऱ्या शिक्षकात अध्यक्ष मंगेश शहारे, उपाध्यक्ष जतेंद्र नागपुरे, सचिव विशाल चव्हाण, पुरुषोत्तम ठवकर, भारत राठोड, सतीश टिचकुले, प्रवीण डोंगरे, नितीन चव्हाण इत्यादी शिक्षकांनी मुंडण करून निषेध केला. शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसह जुनी पेंशन मंजूर करून न्याय द्यावा, अशी मागणी आहे.

Web Title: Mundran movement of all teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.