काळजावर दगड ठेवून पालिका कर्मचारी करतात कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:56+5:302021-05-19T04:36:56+5:30

तुमसर : कोरोनाने सर्व समीकरणे, सर्व गृहितक बदलून टाकली आहेत. जगण्याची पद्धतही बदलली आहे. कोरोनाने लोकांमध्ये अशी दरी निर्माण ...

Municipal employees perform cremation on Kovid patients by placing stones on their care | काळजावर दगड ठेवून पालिका कर्मचारी करतात कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार

काळजावर दगड ठेवून पालिका कर्मचारी करतात कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार

googlenewsNext

तुमसर : कोरोनाने सर्व समीकरणे, सर्व गृहितक बदलून टाकली आहेत. जगण्याची पद्धतही बदलली आहे. कोरोनाने लोकांमध्ये अशी दरी निर्माण केली की, हक्काच्या माणसांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नाही. ना अश्रूंचा हंबरडा, ना आप्तस्वकियांकडून खांदा दिला जात आहे. इतकंच काय, तर कुटुंबातील लोकांकडून रचल्या गेलेल्या सरणावर चिताग्नीसुद्धा देता येत नसताना मात्र काळजावर दगड ठेवून तुमसर नगरपरिषदेचे कर्मचारी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास तत्पर आहेत. त्यांनी महिन्याभरात तब्बल ६० च्या वर कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर डोंगराला येथील स्मशानभूमीत मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोना हा भयानक आजार आहे, असे बिंबवले गेले असल्याने प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. परिणामी बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकही मृतदेहाला हात लावत नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काळजावर दगड ठेवून तुमसर नगरपरिषदचे स्वच्छता विभागाचे अभियंता वीरेंद्र ढोके, प्रभारी आरोग्य निरीक्षक मोहन बोरघरे, कृष्णकांत भवसागर, बरकत शेख यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी नितीन सूर्यवंशी, गुलशन तांडेकर, योगेश खांडेकर, हेमंत रगडे, राजू गोमासे, मंगेश नारनवरे हे कर्मचारी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास तत्पर आहेत.

कोट

४ एप्रिलपासून आमचे कर्मचारी न घाबरता, न डगमगता काळजावर दगड ठेवून येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातून बाधित मृतदेह डोंगराला घाटावर घेऊन जातात. त्या मृतदेहावर पूर्ण दक्षता घेऊन अंत्यसंस्कार करताना मन अनेकदा दुःखी झाले. कोरोनाने हक्काचे नाते विसरायला भाग पाडले असताना आमचा कर्मचारी जिद्दीने कार्य करीत असल्याचा अभिमान आहे.

मोहन बोरघरे, प्रभारी आरोग्य निरीक्षक,

नगर परिषद, तुमसर

Web Title: Municipal employees perform cremation on Kovid patients by placing stones on their care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.