नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:21+5:302021-04-04T04:36:21+5:30
संघटनेने मागण्यांकरिता तीन टप्प्यात आंदोलन छेडण्याचे नियोजन केले. त्यातील पहिल्या टप्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर ...
संघटनेने मागण्यांकरिता तीन टप्प्यात आंदोलन छेडण्याचे नियोजन केले. त्यातील पहिल्या टप्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर १५ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन आणि १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. सहायक अनुदानाऐवजी शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत करण्यात यावे. सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने द्यावेत यांसह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने तुमसर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे प्रतिनिधी जमील शेख, कृष्णकांत भवसागर, देवेंद्र शेंदुर्णीकर, सुनील लांजेवार, निशिथ शुक्ला, मोरेश्वर कापसे, सुनील वाढीभस्मे, गणेश मेहर, जयकिशोर पंचबुद्धे, विनोद रामटेके, आकाश सूर्यवंशी, कैलास वर्मा, संजय साठवणे, सचिन ढबाले, आलोक गुप्ता आदी उपस्थित होते.