पालिका मुख्याधिकाऱ्यांची नगरसेवकांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:27 PM2018-03-13T23:27:39+5:302018-03-13T23:27:39+5:30

साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे.

The municipal officials are notorious about corporators | पालिका मुख्याधिकाऱ्यांची नगरसेवकांशी अरेरावी

पालिका मुख्याधिकाऱ्यांची नगरसेवकांशी अरेरावी

Next
ठळक मुद्देसाकोली येथील प्रकार : पाहणीसाठी मुख्याधिकारी आलेच नाही

आॅनलाईन लोकमत
साकोली : साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे.
साकोलीला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख हे नेहमीच नगरसेवकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानीत करतात. तसेच बैठकीत कंवा नगरपरिषदेत नगरसेवकांनी जर काही विचारले असता, ‘तुम्हाला ते अधिकार नाही. तुम्हाला फक्त नियोजन करण्याचा अधिकार आहे, असे बोलून अपमानीत करतात, असे नगरसेवकांचे म्हणने आहे. मंगळवारीही असाच प्रकार घडला. पंचशिल वॉर्डात सोमवारपासून दोन सिमेंट रस्त्याचे काम सुरु झाले. ही दोन्ही कामे अंदाजपत्रकानुसार होत नाही. अशी तक्रार सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना करीत कामाची पाहणी करण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र मुख्याधिकाºयांनी काम पाहण्यास येण्यासाठी नकार दिला, व नगरसेवकांनाही तुम्हालाही तिथे जाण्याचा अधिकार नाही, असे बोलले. यावर संतप्त नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांचा विरोध करीत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष धनवंता राऊत या काम पाहण्यासाठी आल्या नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून साकोली नगरपरिषदेत लाईट व बोरवेलचे पाईप नाहीत. हे खरेदी करण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे नगरसेवकांचे म्हणने आहे.

मुख्याधिकारी देशमुख यांच्या जागी दुसरा मुख्याधिकारी न दिल्यास सर्व नगरसेवक सामूहिक राजीनामे देऊ असा पवित्रा पालिका उपाध्यक्ष तरुण मल्लानी, गटनेता अनिता पोगडे, नगरसेविका वनिता डोये, गीता बडोले, टेंभुर्णे, रवी परशुरामकर, अ‍ॅड.दिलीप कातोरे, सुभाष बागडे, मोहन चांदेवार, सभापती मिना लांजेवार, मनिष कापगते यांनी घेतला आहे.

मुख्याधिकारी देशमुख हे महिला नगरसेवकांशी नेहमीच उद्धट भाषेत बोलत असून त्यांना अपमानीत करतात. नगरपरिषदेत महिला नगरसेवकांना काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याची वेळीच दखल घ्यावी व महिला नगरसेवकावर होणारा अन्याय दूर करावा.
- अनिता पोगडे, गटनेता, साकोली नगर परिषद
कामाची पाहण्याकरिता नगरसेवक जाऊ शकतात. एखाद्या कामाची तक्रार असल्यास आधी अभियंता जाऊन चौकशी करतील. त्या चौकशी अहवालावर मी पुढील कार्यवाही करीन, असे बोललो. माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी कुठलीही अरेरावी किंवा अपमान केलेला नाही.
- विजय देशमुख, मुख्याधिकारी, नगर परिषदसाकोली

Web Title: The municipal officials are notorious about corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.