चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून, आरोपी पती पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 04:23 PM2021-12-22T16:23:57+5:302021-12-22T16:25:39+5:30

विलास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी वाद घालत होता. त्यामुळे ती आपल्या दोन लहान मुलांसोबत माहेरी भंडारा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होती.

Murder of wife by strangling her with saree due to suspicion of character | चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून, आरोपी पती पसार

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून, आरोपी पती पसार

Next
ठळक मुद्देमेंढाची घटना

भंडारा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा साडीने गळा आवळून खून करण्याची घटना भंडारा शहरातील मेंढा परिसरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती मात्र घटनेपासून पसार झाला आहे.

बबिता विलास मेश्राम (२७) रा. नेहरू वाॅर्ड मेंढा भंडारा मूळ गाव पांढराबोडी असे मृत महिलेचे नाव आहे. पती विलास धनराज मेश्राम (३५) रा.पांढराबोडी असे आरोपीचे नाव आहे. विलास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी वाद घालत होता. त्यामुळे ती आपल्या दोन लहान मुलांसोबत माहेरी भंडारा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होती.

पती विलास हा ट्रक चालक असून रविवारी सायंकाळी तो पत्नी भाड्याने राहत असलेल्या घरी आला. तिच्यासोबत रात्रभर मुक्काम केला. यावेळी त्यांच्यात नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला. या वादात त्याने पत्नीचाच साडीने गळा आवळून खून केला. यानंतर तो तेथून पसार झाला. हा प्रकार बबिताच्या मुलांनी मामा क्रिष्णा चापरे यांना सांगितला. त्यांनी घटनास्थळावर जाऊन बघितले असता बबिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती तत्काळ भंडारा पोलिसांना देण्यात आली.

ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी भेट दिली. याप्रकरणी आरोपी विलास मेश्राम याच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचा शोध सुरू

पत्नीचा साडीने गळा आवळून विलास घटनास्थळावरून पसार झाला. भंडारा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने आपला मोबाइल बंद ठेवला असून त्याच्या लोकेशनवरून पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने मेंढा परिसरात मात्र, एकच खळबळ उडाली.

Web Title: Murder of wife by strangling her with saree due to suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.