शिक्षा भाेगून येताच मित्रांच्या मदतीने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 05:00 AM2022-06-12T05:00:00+5:302022-06-12T05:00:28+5:30
नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वरठी : घरफाेडी प्रकरणात शिक्षा भाेगून येताच मित्राच्या मदतीने रेती व्यावसायिकाचा खून केला. वारंवार हाेणारे वाद आणि त्यातून जिवाची भीती यामुळे मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने सपासप २६ वार करून खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे मृतक आणि मुख्य आराेपीत घनिष्ठ मैत्रीही हाेती. खुनाची ही घटना भंडारा- वरठी मार्गावर गणेश नगरीसमाेर शुक्रवारी सकाळी घडली हाेती.
राहूल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (३०) रा. टाकळी असे मृताचे नाव असून ताे मूळचा उत्तरप्रदेशातील गाैरखपूर येथील रहिवासी आहे. ताे गत अनेक वर्षांपासून भंडाराजवळील टाकळी येथे राहत हाेता. त्याच्याकडे ट्रॅक्टर असून ताे रेतीचा व्यवसाय करीत हाेता. नेहाल अण्णाजी राऊत (२५), अमित उर्फ कचरा सुधाकर चाेपकर, विश्वा उर्फ बग्गा रामकृष्ण गाते (१९) अशी आराेपींची नावे असून ते कुख्यात गुन्हेगार आहेत. मुख्य आराेपी नेहाल राऊत हा अट्टल घरफाेड्या असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. कचरू चाेपकरवरही गुन्हे दाखल असून बग्गा गाते याच्यावर खुनाचा गुन्हा आहे.
नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. अधिक तपास जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मेश्राम करीत आहेत.
बंटी आणि नेहाल यांची हाेती घट्ट मैत्री
- मृतक बंटी जयस्वाल आणि या प्रकरणातील मुख्य आराेपी नेहाल राऊत यांच्यात घट्ट मैत्री हाेती. दाेघात चांगला घराेबा हाेता. नेहालची बंटीच्या घरी नेहमी ये-जा असे. परिवारातील सदस्यांसाेबतही चांगली गट्टी जमली हाेती. दाेघात आर्थिक देवाण-घेवााण हाेत हाेती.
- गत आठवड्यात तुमसर येथे एका हाॅटेलसमाेर तरुणाचा तब्बल २६ वार करुन खून करण्याची घटना घडली हाेती. या घटनेचा व्हिडीओ साेशल मीडियावर वायरल झाला हाेता. या घटनेची शाई वाळत नाही ताेच पुन्हा गणेशनगरी जवळ रेती व्यवसायीकाचा २६ वार करुन खून करण्यात आला.
खून पुर्वनियाेजित
- बंटी जयस्वाल याचा खून पुर्व नियाेजित असल्याचे पाेलीस तपसाात पुढे आले आहे. वादातून आपला जीव जाईल या भीतीने नेहाल राऊतने बंटीचा खून करण्याचे ठरविले हाेते. गुरुवारी रात्रभर दारु प्राशन करुन खुनाचा सापळा रचला. गणेशनगरीजवळ सकाळी बंटी येताच त्याच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकली आणि धारदार शस्त्राने वार केला. बंटी हा आपल्या तिघांनाही भारी पटेल म्हणून प्रथम डाेळ्यात मिरची पावडर फेकून खुन केला. भर रस्त्यावर ही घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.