‘त्या’ अल्पवयीन तरुणीची आत्महत्या नसून हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:32+5:302021-05-29T04:26:32+5:30

लाखांदूर : अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेला पळसाची पाने आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह तालुक्यातील मुरमाडी येथे ...

The murder of 'that' young girl is not suicide | ‘त्या’ अल्पवयीन तरुणीची आत्महत्या नसून हत्याच

‘त्या’ अल्पवयीन तरुणीची आत्महत्या नसून हत्याच

Next

लाखांदूर : अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेला पळसाची पाने आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह तालुक्यातील मुरमाडी येथे आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार तिने आत्महत्या केल्याची पुष्टी देण्यात आली होती. मात्र, आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तरुणीच्या पालकांनी केला आहे.

कल्याणी जनार्दन काळसर्पे (१६) असे मृत तरुणीचे नाव आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी १४ मे रोजी सकाळी १० वाजता ती पूजेला पळसाची पाने आणण्यासाठी सायकलने गेलेली होती. बराच वेळ झाला तरी मुलगी परत आली नाही म्हणून वडील तिला शोधण्यासाठी गेले. बारव्हा मार्गावर कल्याणीची सायकल आढळून आली. मात्र, तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वडील सायकल घेऊन घरी परत आले. चिंताग्रस्त पालक दिघोरी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये शोध घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सायंकाळी ६्.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणीचा मृतदेह मोहाच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दिघोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. शवविच्छेदन अहवालानुसार अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पुष्टी केली आहे.

दुपारच्या सुमारास शेतात शोध घेतला असता मुलगी आढळली नाही. तिने संध्याकाळी आत्महत्या का केली? सकाळच्या सुमारास घराबाहेर गेलेली मुलगी संध्याकाळी झाडाला लटकलेली आढळून आल्याने ती दुपारी कुठे व कोणासोबत होती, असे प्रश्न वडील जनार्दन काळसर्पे व आई किरण काळसर्पे यांनी या निवेदनात उपस्थित केला आहे. पालकांनी परिसरातील एका मुलावर शंका व्यक्त करुनदेखील पोलीस प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली.

===Photopath===

280521\screenshot_2021-05-28-14-06-01-78.jpg

===Caption===

मुलीची आत्महत्या नसुन हत्याच झाल्याचा आरोप करतांना मृतक मुलीचे आई वडील

Web Title: The murder of 'that' young girl is not suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.