तलावातून मुरुमाचे सर्रास खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:10 PM2017-10-23T23:10:06+5:302017-10-23T23:10:24+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मात्र तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Murom's Saras Mining | तलावातून मुरुमाचे सर्रास खनन

तलावातून मुरुमाचे सर्रास खनन

googlenewsNext
ठळक मुद्देपरसवाडा रस्ता बनला धोकादायक : तलावांचे अस्तिव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मात्र तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महसूल प्रशासनाची परवानगी नसताना तलाव खोदून त्यातील मुरुम खनन सर्रास सुरु आहे. तलावात जिवघेणे मोठे खड्डे पडले असून खापा (दे.) रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. रस्त्याजवळच मोठा खड्डा येथे खोदण्यात आला आहे.
देव्हाडी, परसवाडा परिसरात मुरुम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शासनाने सध्या मुरुम खननाची परवानगी नाकारली आहे. परसवाडा गावाजवळ मोहरान हा मोठा तलाव आहे. हिवाळ्यात व उन्हाळ्यात या तलावातून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम खनन करण्यात येते. संपूर्ण तलावाच्या काठावर व तलावात मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे काही जणांचा जीव गेला आहे. तलाव विद्रुप दिसत आहे. परंतु महसुल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
खापा (दे.) ते परसवाडा (दे.) कडे जाणाºया रस्त्याशेजारी एक तलाव असून या तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम खनन करण्यात आले आहे. तलाव रस्त्या शेजारी असल्याने रस्त्यापर्यंत मुरुम उत्खननाचा मोठा खड्डा पडला असून संपूर्ण रस्ताच खड्ड्यात जाण्याची भीती आहे. वळणावर हा खड्डा पाडण्यात आला आहे. हजारो ब्रास मुरुम येथे खननाचे पूरावे उघड्या डोळ्याने दिसतात. परंतु संबंधित विभागाने कारवाईची तसदी घेतली नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. ऐरवी नियमावर बोट ठेवणाºया विभागाचे येथे पितळ उघडे पडले आहे. अर्थकारणामुळेच कारवाई होत नाही अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी केली आहे.

दोन्ही तलावातून अवैध मुरुम उत्खनन केल्यामुळे तलाव खड्डेमय झाले आहेत. याची पुराव्यानिशी तक्रार विभागीय आयुक्तांना करणार असून दोषीवर कारवाईची मागणी करणार आहे.
-राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता परसवाडा (दे.)

Web Title: Murom's Saras Mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.