पवनारा येथे संगीतमय श्रीमद भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:20+5:302021-02-24T04:36:20+5:30

पवनारा : श्रीमद भागवत श्रवणाने मनुष्याचे मन सकारात्मक विचार बाळगतो. तसेच श्रीमद भागवत श्रवणाने मोक्षप्राप्ती लाभून ईश्वर प्राप्ती लाभते ...

Musical Shrimad Bhagwat at Pawanara | पवनारा येथे संगीतमय श्रीमद भागवत

पवनारा येथे संगीतमय श्रीमद भागवत

googlenewsNext

पवनारा : श्रीमद भागवत श्रवणाने मनुष्याचे मन सकारात्मक विचार बाळगतो. तसेच श्रीमद भागवत श्रवणाने मोक्षप्राप्ती लाभून ईश्वर प्राप्ती लाभते व जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकविते, असे प्रवचन शैलेंद्र मिश्रा महाराज यांनी केले.

तुमसर तालुक्यातील पवनारा येथे पहिल्यांदाच भागवत असल्याने गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. यात महिलावर्गाचाही सिहांचा वाटा होता. घरासमोर स्वच्छता ठेवून प्रत्येक घरासमोर रांगोळी घालण्यात आल्या होत्या पहिल्या दिवशी कळस यात्रा गावातून निघाली त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्रीमद भागवत कथेचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी योगेश शिंगनजुडे, सरपंच रशीद शेख, प्रमोद कटरे व गावातील मान्यवर उपस्थित होते रोज सायंकाळी प्रवचनकार शेलेंद्र मिश्रा महाराज व सहकारी सुभाष दुबे महाराज, राहुल दुबे महाराज श्रीमद भागवत चे ज्ञान देत होते यात गावकऱ्यांनी ही दररोज श्रीमद भागवत श्रवण केले

सातव्या दिवशी रविवारी श्रीमद भागवत कथेला विराम देण्यात आले व दुपारी दहीकाला माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व सायंकाळी महाप्रसाद याप्रसंगी जि. प.सदस्य संदीप ताले,प.समिती सदस्य गुरुदेव भोंडे,कृ. उ.बाजार समिती संचालक डॉ हरेंद्र रहांगडाले, नसरपंच रशीद शेख, नामदेव चौधरी, चंद्रभान बले, हनुमान देवस्थान पंचकमेटी कार्यकारिणी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीकरिता विनोद ढोलेवार, दशरथ नेवारे, दिनेश भरडे, दुर्गेश हाडगे, रामसिंग रावते, सुखदेव पटले, खुशाल कुर्वे, कल्पना पटले, सुनीता रहांगडाले, हौसीलाल रहांगडाले, अनिता रहांगडाले यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Musical Shrimad Bhagwat at Pawanara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.