कोट्यवधीचा निधी आणून साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:47+5:30

साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करुन गावकऱ्यांनी रॅली काढली.

My dream is to bring hundreds of millions of funds to the overall development of the Sakoli area | कोट्यवधीचा निधी आणून साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

कोट्यवधीचा निधी आणून साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

Next
ठळक मुद्देपरिणय फुके : प्रचारादरम्यान गावागावांत जल्लोषाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी खेचून आणून अधिकाधिक चांगल्या पध्दतीने साकोली क्षेत्राचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी तुमची साथ हवी आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना युतीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी केले.
साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करुन गावकऱ्यांनी रॅली काढली. यावेळी आमदार बाळा काशीवार, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, तामेश्वर गहाणे, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. श्याम झिंगरे, भाजप तालुकाध्यक्ष लखन बर्वे, गीता कापगते, अ‍ॅड. हलमारे काका, नेपाल रंगारी, डॉ. राजेश नंदुरकर, विजया नंदुरकर, भोजराम कापगते, भरत खंडाईत, यशवंत भेंडारकर, नरेंद्र वाडीभस्मे, अल्का उपरीकर, परमानंद गहाणे यांच्यासह बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.डॉ. परिणय फुके म्हणाले, आपण पोलीस पाटलांचा मानधनाचा प्रश्न सोडविला. मच्छिमार बांधवांसाठी तलावाचे लीज माफ करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी, गोवारी व धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. आता मला केवळ विश्वासाने ११ दिवस मदत करा, मी पाच वर्षाच्या विकासाचे आश्वासन देतो, अशी ग्वाहीे त्यांनी दिली.

परिणय फुके यांचे धानाची पेंढी देऊन शेतकऱ्यांकडून स्वागत
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे ओंब्या असलेली धानाची पेंढी देवून स्वागत केले. शेतकºयांप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीने मतदारसंघात त्यांच्याप्रती विश्वास निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, नूतन कांबळे, नरेश खरकाटे, नरेश देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: My dream is to bring hundreds of millions of funds to the overall development of the Sakoli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.