माझ्या मुलाला पोलिसांनीच मारले

By admin | Published: June 24, 2016 01:14 AM2016-06-24T01:14:09+5:302016-06-24T01:14:09+5:30

माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा मृत्यू सिहोरा पोलीस ठाण्यात झाला व नंतर आत्महत्येचा बनाव पोलिसांनी केला,

My son was killed by the police | माझ्या मुलाला पोलिसांनीच मारले

माझ्या मुलाला पोलिसांनीच मारले

Next

कुटुंबीयांचा आरोप : प्रकरण सोनेगाव जंगलातील तरुणाच्या मृत्यूचे
तुमसर : माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा मृत्यू सिहोरा पोलीस ठाण्यात झाला व नंतर आत्महत्येचा बनाव पोलिसांनी केला, असा आरोप सोनेगाव जंगलात कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या तरुणाच्या आई-वडील व भावांनी तुमसर येथे पत्रपरिषदेत केला.
पैकाटोला येथील सोमा लक्ष्मीचंद उके (२५) याचे लग्न तुमसर तालुक्यातील पिपरी चुन्नी येथील कल्पना अनिल मेश्राम (२२) हिच्याशी ३१ मार्च २०१६ रोजी लग्न झाले होते. २५ मे ला सासू प्रभा मेश्राम, माझा मुलगा सोमा व सून कल्पना पिपरी चुन्नी येथे घेऊन गेली. २९ मे ला पहाटे सोमा व पत्नी कल्पना हीने विष प्राशन केले. दोघांना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणले. कल्पनाची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी भंडारा येथे रेफर केले. दरम्यान वाटेत कल्पनाचा मृत्यु झाला. तिचे प्रेत तुमसर येथे परत आणण्यात आले. पती सोमा पत्नी मृत्युची वार्ता ऐकून पसार झाला.
पैकाटोला येथे कल्पनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पती सोमा झाडावर बसून पाहत होता. ग्रामस्थांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यामुळे त्याने झाडावरून उडी घेतली. यात त्याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या. गावचे पोलीस पाटीलांनी गंगाझरी पोलिसांना ही माहिती दिली. गंगाझरी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार करण्याकरिता नेले. सिहोरा पोलिसांनी सोमाचा भाऊ सत्यवान व चुलत भाऊ सुखदेव उके यांना पत्र देऊन सिहोरा येथे पोलीस ठाण्यात बोलाविले. ३१ मे रोजी बयान घेतले. दरम्यान सोमा पोलीस ठाण्यात दिसला. दुसऱ्या दिवशी सत्यवान व सुखदेव गावाकडे रवाना झाल्यानंतर सिहोऱ्याचे दोन पोलीस कर्मचारी पैकाटोला येथे आले व सोमाचा फोटो मागितला. सोमा कुठे आहे, अशी विचारणा केल्यावर त्याला तिरोडा येथे सोडण्यात आले, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: My son was killed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.