मोहाडी येथे माझी वसुंधरा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:35+5:302021-01-08T05:53:35+5:30
निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित असलेले पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर पर्यावरण आहे, याचे ...
निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित असलेले पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर पर्यावरण आहे, याचे जतन करणे काळाची गरज आहे, या विषयावर चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक अविनाश चौधरी यांनी पर्यावरण विषयी पंचतत्त्वाचे संरक्षण करणे, वनीकरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, वायू तत्त्वाचे संरक्षण, ऊर्जेचा परिणामकारक वापर, उर्जाबचत, पाणी व्यवस्थापन, जैवविविधतेचे रक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. पर्यावरण संरक्षणाचे विविध फलक विद्यार्थ्यांच्या हातात देऊन जनजागृती करण्याचे आव्हान केले. याप्रसंगी नगरपंचायत मोहाडीचे पल्लवी जामोदकर, दिलीप नंदेश्वर, विनोद ढगे, पुरूषोत्तम सेलोकर, अनिल दहिवले, गजानन तितिरमारे, सुखदेव आगाशे, प्रकाश मते, ममता खवास, हेमंत लोंदासे, गजानन तितिरमारे, रूपेश साखरवाडे उपस्थित होते. संचालन खुशाल शेंडे व भरत रासे यांनी केले.