नागपूर शिक्षण मंडळ सचिवांची ओम सत्यसाई महाविद्यालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:24+5:302021-03-04T05:07:24+5:30
जवाहरनगर : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी येथील ओम सत्यसाई महाविद्यालयाला भेट देऊन बारावीच्या परीक्षेबाबत ...
जवाहरनगर : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी येथील ओम सत्यसाई महाविद्यालयाला भेट देऊन बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष वसंत कारेमोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या लेखाधिकारी वर्षा हेबीज, संस्थाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, प्रा. नरेंद्र पलांदूरकर, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. माधुरी सावरकर यांनी यावेळी बारावीची परीक्षा, ऑनलाईन अभ्यास याविषयी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आशा आकरे यांनी केले तर डॉ. वंदना गिरेपुंजे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ममता वाडीभस्मे, प्रा. दर्शना गिरडे, प्रा. वर्षा भुरे, प्रा. मनिषा जांबुळकर, प्रा. सुप्रिया वाडीभस्मे, प्रा. रूपाली रामटेके, प्रा. प्रगती सुखदेवे, प्रा. माधुरी भालाधरे, प्रा. मिथुन मोथरकर, प्रा. महादेव हटवार, प्रा. प्रतीक घुले, प्रा. चेतन हटवार, प्रा. अरविंद डोंगरे, प्रा. हर्षानंद वासेकर, प्रा. मंगेश वंजारी, महादेव खंडाळे, रामकृष्ण आकरे, कुमुद गोस्वामी, संध्या उरकुडे, तुलाराम वासनिक, राजेश चोपकर, दीपक आखरे, चंदा शेंडे यांनी सहकार्य केले.