अभयारण्यातील वृक्षांना सूचना फलकांसाठी ठोकले खिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:51 PM2019-03-23T21:51:51+5:302019-03-23T21:52:08+5:30
कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आल्याचा गैरप्रकार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत आहे. तसेच पर्यावरण कायद्याला या ठिकाणी ठेंगा दाखविण्यात आल्याने वरिष्ठ वनाधिकारी प्रकरणी दखल घेतील काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमीकडून विचारला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आल्याचा गैरप्रकार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत आहे. तसेच पर्यावरण कायद्याला या ठिकाणी ठेंगा दाखविण्यात आल्याने वरिष्ठ वनाधिकारी प्रकरणी दखल घेतील काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमीकडून विचारला जात आहे.
कोका अभयारण्यात महाशिवरात्रीच्या पुर्वी अभयारण्यातून जाणाºया टेकेपार ते कोका, दुधारा ते सालेहेटी व ढिवरवाडा ते किटाळी मार्गावरील रस्त्याच्या कडेला विविध माहिती देणारे सुचना फलक झाडांना ठोकण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, सुचना फलक प्लास्टिकचे असतांना त्यांना झाडावर लावतांना मात्र, खिळे ठोकण्यात आले आहेत. एका माहितीनुसार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सुमारे ४०० लहान प्लास्टिकचे सूचना फलक अभयारण्यातील विविध मार्गावरील झाडांना खिळ्याद्वारे ठोकण्यात आले आहे. शहरात झाडांना जाणते-अजाणतेपणे खिळे ठोकून इजा पोहचविण्याचे प्रकार दिसून येतात. परंतू पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर सोपविलेली आहे. ज्यांना विविध प्रकारचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून हा गैरप्रकार पहिल्यांदाच होतांना दिसत आहे.
मागील वर्षांपर्यंत भंडारा शहरातील राष्टÑीय महामार्गावर असाच प्रकार दिसून यायचा. मात्र, निसर्ग प्रेमींनी झाडांना होणारी इजा व वेदना लक्षात घेत स्वत: खिळेमुक्त झाडे अभियान राबवून झाडांना जीवनदान दिले. ठोकलेले खिळे कालांतराणे गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो. परिणामी झाडे खंगत जातात. त्यांचे आयुष्य कमी होते, शहरी भागात जाहिरात फलक व व्यवसायाची माहिती देण्याची हा गैरप्रकार केला जातो. बहुतेकांना झाडांचे नुकसान होते, याचीही कल्पनाही नसते.
अभयारण्यात हार्नबंदी, प्लास्टिक बंदी, स्वच्छता राखा, वेग मर्यादा व प्रवेशास बंदी आदींची माहिती देणार हे सुचना फलक असले तरी ते झाडांवर खिळ्याने ठोकणे योग्य आहे का? खिळे ठोकताना काही खिळे वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीच्या व चराईच्या क्षेत्रातही पडलेले पर्यटकांना दिसून आले. त्यामुळे एखादा खिळा वन्यजीवांच्या तोंडात जावून त्यांना धोका पोहचवू शकतो. याशिवाय जनावरांच्या पायाखाली आल्यास त्यांना इजा पोहचू शकतो. तसेच झाडे हे सजीव आहेत. त्यानाही यातना होतील, याची थोडी कल्पना वनाधिकारी यांना नाही काय, असे अनेक प्रश्न निसर्ग प्रेमीकडून विचारण्यात येत आहेत.
अभयारण्यातील झाडांना खिळे ठोकण्याच्या सूचना दिलेल्या नव्हत्या. ४०० सूचना फलकाचे आॅर्डर दिलेले होते. मात्र, तेवढे लावण्यात आलेले नाहीत. वनकर्मचाºयांना दोºया दिलेल्या होत्या. झाडांना सुचना फलक लावलेले दिसून आले. मात्र, खिळे ठोकलेले दिसून आले नाही. प्रकरणी माहिती घेतली जाईल.
- सचिन जाधव
वनपरिक्षेत्राधिकारी, अभयारण्य कोका