नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राने फुलविली साग व मिश्र रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:23 AM2021-07-08T04:23:38+5:302021-07-08T04:23:38+5:30
०७लोक ०२ के पवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत पाथरी येथे लगभग ६० हजार सागवनासह इतर झाडाची रोपवाटिका तयार ...
०७लोक ०२ के
पवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत पाथरी येथे लगभग ६० हजार सागवनासह इतर झाडाची रोपवाटिका तयार आहे, बदलत्या वातावरणामुळे झाड लावून संगोपन करणे आवश्यक झाले, म्हणून प्रत्येकाने एक झाड लावून संगोपन करण्याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी आवाहन केले आहे.
कोविडच्या महामारीत प्रत्येकाला झाडाचे महत्त्व माहीत झाले. कित्येकाने औषधोपयोगी झाडाचे अर्क सेवन केले आहे. वातावरणात ऑक्सिजन वाढीकरिता, प्रदूषण व पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी झाडच एकमेव साधन आहे. पाथरी येथील रोपवाटिकेत सागवन, बेल, आंबा, जांब, मुंगणा,वड,बेहळा, आंजन, कडुनिंब, खैर, जांभूळ, बोर, सीरस, निंबू आदी जातीचे मौल्यवान झाडे उपलब्ध असून दहा रुपये झाडाप्रमाणे विक्री सुरू आहे याबाबत क्षेत्रसाहाय्यक सुनील दिघोरे, वनरक्षक सचिन वाढीवाले यांनी सांगितले. प्रत्येकांनी एक झाड लावून संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करावे व वृक्षतोडीला आळा घालून जंगलवाढीला वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी केले.
070721\img-20210705-wa0035.jpg
पाथरी येथील सागवन व मिश्र रोपवाटिका