साकोलीवासीयांच्या नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे

By admin | Published: October 10, 2015 12:59 AM2015-10-10T00:59:32+5:302015-10-10T00:59:32+5:30

भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात असलेलया ग्रामपंचायतचे रुपांतर तब्बल ७७ वर्षांनी नगर पंचायतमध्ये झाले.

Nakkad Nagar council council of Sakoli people | साकोलीवासीयांच्या नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे

साकोलीवासीयांच्या नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे

Next

नगर पंचायत रद्द : ८१ इच्छुकांनी दाखल केले होते नामांकन
साकोली : भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात असलेलया ग्रामपंचायतचे रुपांतर तब्बल ७७ वर्षांनी नगर पंचायतमध्ये झाले. दहा महिन्यानंतर नगर पंचायतचे रुंपातर नगर परिषदेत होणार असा राज्यपालाचा अध्यादेश आला आणि मधेच नगर पचांयतची निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला होता. मात्र उच्च न्यायालयाचे स्थगनादेश मिळताच साकोलीवासीयांच्या नगर परिषदेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून आता नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे लागलेल्या आहेत.
पूर्वी इंग्रजकाळापासून भंडारा जिल्हयात साकोली व गोंदिया हे दोन तालुके होते. त्यातही भंडारा व गोंदिया तालुक्यानंतर साकोली येथील ग्रामपंचायत ही जुनी ग्रामपंचायत म्हणून लौकीकास आली होती. कालांतराने जिल्हयात बऱ्याच ग्रामपंचायत व तालुके झाली. मात्र साकोली विकासात्मकदृष्ट्या मागेच राहिली. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत राहिली. मात्र ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेत होऊ शकले नाही.
दहा वर्षापूर्वी माजी आमदार सेवक वाघाये यांनी नगर परिषदेसाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी नगर पंचायतीची घोषणा होऊन अधिसूचनाही जाहिर करण्यात आली होती. मात्र काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया तशीच थंडबस्त्यात राहिली. यानंतर साकोली ग्रामपंचायतकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
मागीलवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील तालुकास्तरावर असलेल्या सर्वच ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतमध्ये केले. त्यात साकोली ग्रामपंचायतीचाही समावेश होता. त्याच आधारावर साकोली नगर पंचायतची प्रक्रिया सुरु होती. दोन महिन्यपुर्वी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी नगर पंचायतचे रुपांतर नगर परिषदेत व्हावे यासाठी प्रयत्न केले.
साकोली सेंदुरवाफा दोन्ही गावे मिळून नगरपरिषेदची अधिसुचनाही निघाली मात्र आदेशाच्या निर्धारित वेळेअभवीच नगरपंचायतीच्या निवडणूका घोषीत झाल्याने नागरिकांत संभ्रम वाढला. आधीच अडीच वर्षात ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायत झाली व आताही शासनाची भुमीका स्पष्ट नव्हती. एकीकडे नगर परिषदेची अधिसुचना व दुसरीकडे नगर पंचायतीच्या निवडणुका या संभ्रमात माजी सभापती मदन रामटेके यांनी जनहीत याचिका टाकून स्थगतादेश मिळविला. या स्थगनादेशावरुन पुन्हा प्रक्रीया तर वाढलीच मात्र आता साकोली नगर परिषद केव्हा होणार याकडे साकोलीवासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nakkad Nagar council council of Sakoli people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.