नाल्या तुंबल्या; विरली-लाखांदूर मार्गावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:18 PM2018-07-02T23:18:44+5:302018-07-02T23:19:14+5:30

विरली/बुज. ते लाखांदूर मार्गावर दुतर्फा असलेल्या नाल्यांचा उपसा न झाल्यामुळे विरली/ बु. बसस्थानक परिसरातील नाल्या तुंबल्याने तुमसर एक कि.मी. मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरुन मार्गक्रमण कठीण झाले आहे.

Nalla Tumblia; Water on Virali-Lakhandur road | नाल्या तुंबल्या; विरली-लाखांदूर मार्गावर पाणी

नाल्या तुंबल्या; विरली-लाखांदूर मार्गावर पाणी

Next
ठळक मुद्देजनतेचे आरोग्य धोक्यात : दोन यंत्रणांच्या वादात अडकली नाली सफाई, मार्गक्रमण करणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली/बुज. : विरली/बुज. ते लाखांदूर मार्गावर दुतर्फा असलेल्या नाल्यांचा उपसा न झाल्यामुळे विरली/ बु. बसस्थानक परिसरातील नाल्या तुंबल्याने तुमसर एक कि.मी. मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरुन मार्गक्रमण कठीण झाले आहे.
सुमारे १५ वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम केले. मात्र या नाल्यांचा उतारा बरोबर काढला नसून या नाल्यांवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. याकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई न झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी विरली/बु. बसस्थानक परिसरातील सुमारे एक किमी मार्गावर पाणी साचल्याने या रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे.
गावातील नाल्यांचा उतारा मुख्य मार्गावरील नाल्यांवर असल्यामुळे नेहमीच या नाल्यांमध्ये पाणी साचून राहते. परिणामी गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्याकडेला व्यापाºयांची दुकान चाळ आहे. रस्त्यावर साचलेलया पाण्यामुळे या दुकानांमध्ये जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक दुकानात येत नसल्याने या दुकानदारांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला रस्ता पूर्णपणे उखडण्याची शक्यता बळावली आहे.
या नाल्याच्या साफसफाईसाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या नाल्यांच्या सफाईची जबाबदारी नेमकी कुणाची? असा प्रश्न गावकºयांसमोर उभा ठाकला आहे. जनतेचे हित लक्षात घेता. ग्रामप्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सामंजस्याने या प्रश्नाकडे लक्ष देवून तातडीने नाल्यांवरील अतिक्रमण हटवून नाल्यांची सफाई करावी अशी मागणी जनतेची आहे.
नाली बांधकामाचे घोडे अडले कुठे ?
सुमारे दोन अडीच महिन्यांपूर्वी सिंदपूरी- विरली-लाखांदूर अर्जुनी/ मोरगाव मार्गाच्या मजबुतीकरण देखभाल व दुरुस्ती कामाचे भूमिपूजन आमदार बाळा काशीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तीन कोटी रुपयांच्या या बांधकामात रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम आणि विरली बु. बसस्थानक परिसरातील एक किमी सिमेंट रस्ता प्रस्तावित होता. सद्यास्थितीत लाखांदूर ते विरली बु. सिमेपर्यंत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र विरली बसस्थानक परिसरातील सिमेंट रस्ता आणि नाली बांधकामाचे काम नेमके अडले कुठे? हे कळायला मार्ग नाही.
आजाराला आमंत्रण
संपूर्ण पावसाळाभर या ठिकाणी पाणी साचून राहते. या नाल्याच्या बाजूनेच गावकºयांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईन टाकलेली आहे. त्यामुळे हे दुषित पाणी पाईपलाईमध्ये झिरपून गावकºयांना दुषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या नाल्या आजाराला आमंत्रण देणाºया ठरल्या आहेत.

सध्या या कामासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे या रस्त्यावरील प्रस्तावित नाली, बांधकामाचे काम रखडले आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने नाली बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. नाली सफाई करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची नाही.
- आर. एम. ठाकुर
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग लाखांदूर

Web Title: Nalla Tumblia; Water on Virali-Lakhandur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.