विरलीत ‘एक दिया शहिदों के नाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:48 AM2017-10-22T00:48:48+5:302017-10-22T00:48:58+5:30

येथील नवयुवक शारदोत्सव मंडळ तथा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने दहा दिवसीय दिपोत्सव उत्साहापूर्ण वातवरणात साजरा करण्यात येत आहे.

The name of 'a given martyr' | विरलीत ‘एक दिया शहिदों के नाम’

विरलीत ‘एक दिया शहिदों के नाम’

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला कार्यक्रम : शहिदांना श्रद्धांजली, कार्यरत सैनिकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : येथील नवयुवक शारदोत्सव मंडळ तथा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने दहा दिवसीय दिपोत्सव उत्साहापूर्ण वातवरणात साजरा करण्यात येत आहे. या दिपोत्सवानिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'एक दिया शहिदों के नाम' हा उपक्रम राबवून विरलीकरांनी भारतीय सैन्यदलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्य्रकमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विरली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शंकर हुमणे, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कोरे, सहायक शिक्षक मुकेश भेंडारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम पवनकर, यादोराव महावाडे उपस्थित होते. याप्रसंगी गावकºयांनी आपापल्या घरून दिवे आणून दिपोत्सवाच्या मंडपात ओळीने ठेवले होेते. यावेळी देशाचे रक्षण करताना सीमेवर आपल्या प्राणाची आहूती देणाºया शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या मुन्ना शहारे आणि आशिष कोल्हे या दोन विरलीकर जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शंकर हुमणे यांनी देशासाठी बलिदान देणाºया शहिदांना केवळ परमवीरचक्र देवून चालणार नाही तर त्यांच्या पश्चात शहिदांच्या कुटुंबियांची आबाळ होणार नाही याची शासनाने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
उद्धव कोरे यांनी लष्करी साधन सामुग्रीच्या बाबतीत आपला देश कदाचित जगात दुसरा किंवा तिसरा असेलही पण लढावू बाणा आणि दुर्दम्य आत्मविश्वासात आपले सैन्यदल जगात नंबर एक असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी मुकेश भेंडारकर, बळीराम पवनकर या वक्त्यांनीही भारतीय सैन्यदलाविषयी प्रशंसोदगार काढून सीमेवर दिवाळी साजरी करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सत्कारमुर्ती मुन्ना शहारे आणि आशिष कोल्हे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश राऊत तर आभार प्रदर्शन योगेश महावाडे यांनी केले.

Web Title: The name of 'a given martyr'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.