चालानच्या नावावर वाहनचालकांची लूट

By admin | Published: November 16, 2015 02:08 AM2015-11-16T02:08:20+5:302015-11-16T02:08:20+5:30

धान, भाजीपाला यासह अन्य शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते;...

In the name of the invoice, the robbery of drivers | चालानच्या नावावर वाहनचालकांची लूट

चालानच्या नावावर वाहनचालकांची लूट

Next

भंडारा : धान, भाजीपाला यासह अन्य शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते; पण वाहतूक शाखेच्या दडपशाहीला वाहनचालक कंटाळले आहेत. दररोज शहरात जावे लागत असल्याने चालान न घेता पैसे उकळले जात असल्याचे वाहन चालक सांगतात.
गाडी ओव्हरलोड आहे, वजन करावे लागेल, अडीच हजारांची चालाण लागेल, अशा स्वरूपाच्या वक्तव्याने अधिकाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून पैसे घेतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण युवक उपस्थित करीत आहेत. पॉईंट सोडून भलतीकडेच शिपाई फिरताना दिसतात, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शहरातील युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते. अधिक रकमेच्या चालाणची भीती दाखवून पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, आॅटो सोडून दुचाकी चालकांवरच अधिक कारवाई होताना दिसते. यामुळे ग्रामीण नागरिक दुचाकी घरी ठेवून आॅटोने भुर्दंड सोसत शहरात जात असल्याचे दिसते.
वाहनांचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. दारासमोर बैलजोडी दिसणार नाही; पण दुचाकी हमखास दिसते, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी दुचाकी असल्याचे दिसते. वाहतूक सोईची व्हावी म्हणून वाहनांचा वापर वाढत असला तरी वाहन चालकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार दररोज घडत आहे.
याच प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरी मोटारसायकल असताना आॅटोने प्रवास करताना दिसतात. शहरात कोणत्याही रस्त्याने गेले तरी वाहतूक पोलीस शिपाई ग्रामीण नागरिकांना अडवितात. या प्रकारामुळे अनेक युवक त्रस्त झाले आहेत. कागदपत्राची चौकशी करताना एखादा कागद नसला तरी त्याला चालाण फाडावी लागेल, असे ग्रामीण युवक सांगतात.
दुसरीकडे शहरी युवक वाहतूक भरधाव जात असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. वाहतूक शाखेतील काहींमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. यावर लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामीण वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the name of the invoice, the robbery of drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.