साकोलीतील त्या चौकाला ‘बाबासाहेबांचे’ नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:30+5:302021-06-21T04:23:30+5:30
साकोली शहरातील उड्डाणपुलाचे कार्य निर्माणधीन प्रगतीवर आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर मुख्य अशा एकोडी रोड चौकात उत्तरेला जवळच बोधिसत्व डॉ. ...
साकोली शहरातील उड्डाणपुलाचे कार्य निर्माणधीन प्रगतीवर आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर मुख्य अशा एकोडी रोड चौकात उत्तरेला जवळच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती व तथागत गौतम बुद्ध विहाराचे नवनिर्माणधीन कार्य प्रगतीवर आहे. सदर समितीची जमीन एक एकर आराजी जागेत असून येथे दरवर्षी समितीद्वारे सामाजिक, धार्मिक, जनजागृतीसह धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, महात्मा फुले जयंती, तथागत गौतम बुद्ध जयंती व इतर दर्शनार्थी या विहारात येतात. विशेष म्हणजे या मुख्य चौक परिसरात पोलीस ठाणे, उपजिल्हा रुग्णालय, जुने तहसील, न्यायालय आहे. या चौकाला ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नामांतरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर स्मारक समितीचे अध्यक्ष अ.शि.रंगारी, सचिव ॲड. प्रभाकर बडोले, सोनू राऊत कार्यकारी सदस्य व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.