नेरी ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:02 PM2018-01-21T23:02:24+5:302018-01-21T23:03:37+5:30

वरठी पासून ३ किलोमीटर अंतरावर २,२०० लोकवस्तीचे नेरी गाव. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन दशकापासून असलेली सत्ता पालटून गावाच्या विकासाची सूत्र युवा सरपंच आनंद मलेवार यांच्याकडे आली.

Nari will move from the cleanliness of the Gram Panchayat to prosperity | नेरी ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

नेरी ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : लोकसहभाग व बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान

तथागत मेश्राम।
आॅनलाईन लोकमत
वरठी : वरठी पासून ३ किलोमीटर अंतरावर २,२०० लोकवस्तीचे नेरी गाव. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन दशकापासून असलेली सत्ता पालटून गावाच्या विकासाची सूत्र युवा सरपंच आनंद मलेवार यांच्याकडे आली. राजकारणाचा अनुभव नसलेल्या सरपंचानी सहकारी उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक निरंजना खंडाळकर यांच्या मदतीने गावात अभिनव उपक्रम राबवले.गावाची स्वच्छतेकडून समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल आहे.
तलावाच्या पायथ्याशी असलेले पुरातन मंदिर हे एखाद्या पर्यटन स्थळाला लाजवेल असे देखणे व आकर्षक दिसते. गावाच्या विकासात असलेला युवक व महिलांचा सहभाग आणि सर्व सुविधायुक्त ग्राम पंचायतीची इमारत आहे. नेरी हे गाव खेड्यात मोडते. ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. घराघरात जनावरे आणि मुख्य मार्गावर खताच्या खड्ड्याने गावात स्वागत होत असे. गावाच्या मुख्य मार्गावर व लोकवस्तीत असलेल्या खड्ड्यांमुळे गावात दुर्गंधीयुक्त व वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
सिमेंटचे रस्ते हे मातीने व कचऱ्याने सजलेले राहायचे. सरपंच आनंद मलेवार व उपसरपंच रामदास जगनाळे यांनी गावातील युवकांमध्ये जनजागृती करून मुख्य मार्गावर स्थित खताच्या खड्ड्यांचे निर्मूलन केले. विरोध पत्करून गावातील खताचे खड्डे गावाबाहेर हलवून खड्ड्याचे रूपांतर रस्त्यात करून दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली.
गावाच्या चारही बाजूला मुख्य प्रवेश व्दारावर सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. गावात असलेल्या केंद्रीय शाळेत डिजिटल क्लासरूम लोकवर्गणीतून तयार करण्यात आली. विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय परिसर सी सी टीव्ही कमरेच्या नजरेत ठेवण्यात आले आहे. गावात असलेले समाज मंदिर हे सुशोभित करून नियमित होणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाच्या करीत खुले करण्यात आले आहे. व्यायाम शाळा व वाचनालयाचे संचालन युवक स्वत: करतात. कचरा कंटेनरची व्यवस्था केली.सरपंच आनंद माळेवर यांनी आपली कसोटी पणाला लावून गावात महिला व युवकाची फौज उभी केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून श्रमदान म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सुरक्षा दलाची स्थापना करून गावात उघड्यावर फेकण्यात येणाºयांवर लक्ष ठेवण्यात येते. यासाठी जिल्हा स्तरावरून मदत घेण्यात येत आहे. सध्या स्थित २ हजारच्या लोकवस्तीत ५०० च्या वर महिला पुरुष या कामात नियमित मदत करीत आहेत. सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाळे, ग्राम पंचायत सदस्य कमलेश वैद्य, अजय लांजेवार, आनंद गेडाम, लक्ष्मी पालांदूरकर, रिटा मेश्राम, निरंजना हजारे, साधना पडोळे, प्रतिमा भांडारकर व ग्रामसेवक निरंजना खंडाळकर यांची टीम स्वच्छतेकडून समृद्धीकडे उपक्रमासाठी आहेत.
अभिनव स्वागत, आकर्षक इमारत
नेरीच्या मुख्य चौकात रस्त्यावर ग्राम पंचायतीची इमारत आहे. ग्राम पंचायत परिसरात केलेले सौंदर्यीकरण आणि देखणी व आकर्षक आहेत इमारत सहज विचार करायला लावते. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला सहज लक्ष वेधून घेईल असे आवार तयार करण्यात आले आहे. अभिनव स्वागत व आकर्षक इमारत हा ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची जमेची बाजू आहे.
तलावाच्या पाळीवर आकर्षक मंदिर
गावाच्या शेवटच्या टोकावर एक मोठा तलाव आहे. तलावाच्या पायथ्यावर देखणे असे निसर्गरम्य असलेले वृक्षाचे डोलारा गावाच्या सौंदर्यात भर घालते. तलावाच्या खालच्या बाजूला असलेली जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आणि मैदानात खेळणारे मुले हि निसर्गरम्य पर्यटन स्थळाची आठवण करून देतात.आकर्षक आहे.

Web Title: Nari will move from the cleanliness of the Gram Panchayat to prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.