सिहोऱ्यातील अरुंद राज्यमार्गामुळे होतो चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:19 PM2019-02-08T21:19:20+5:302019-02-08T21:19:44+5:30

तुमसर- बपेरा राज्य मार्ग खड्यात गेला असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गाची रुंदी आणि दुरुस्ती अडली असल्याने सिहोराचे बस स्थानकावर वारंवार चक्काजाम चा अनुभव नागरिकांसह वाहनधारक घेत आहेत. यावेळी वाहनाची कोंडी होत आहे.

The narrow road in the Sahara leads to the congestion | सिहोऱ्यातील अरुंद राज्यमार्गामुळे होतो चक्काजाम

सिहोऱ्यातील अरुंद राज्यमार्गामुळे होतो चक्काजाम

Next
ठळक मुद्देबस स्थानकावर वाहनांची गर्दी : खड्डेमय रस्त्याला मुरुमाचा लेप

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर- बपेरा राज्य मार्ग खड्यात गेला असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गाची रुंदी आणि दुरुस्ती अडली असल्याने सिहोराचे बस स्थानकावर वारंवार चक्काजाम चा अनुभव नागरिकांसह वाहनधारक घेत आहेत. यावेळी वाहनाची कोंडी होत आहे.
तुमसर - बपेरा राज्य मार्ग पुर्णत: खड््यात गेला आहे. या राज्य मार्गावर खड्यामुळे अनेक वाहन धारकांनी जीव गमावला आहे. तर काही वाहनधारकांना अपंगत्व आले आहे. २८ किमी अंतर लांब असणाºया या राज्य मार्गाची साधी दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे या राज्य मार्गावर वाहन धारकांचे मरण स्वस्त झाले आहे.
राज्य मार्गाची रुंदी वाढविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले नाही. यामुळे नागमोडी वळणावर वाहने झाडावर आदळत आहेत.
वळणावर विरुध्द दिशेने येणारी वाहने दिसून येत नाही. सिहोरा गावात बस स्थानक शेजारी राज्य मार्ग अरुंद असल्याने दुहेरी वाहनांना मार्ग काढतांना अडचण ठरत आहे. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत या बसस्थानकावर वारंवार नागरिक आणि वाहनधारक चक्काजाम होत असल्याचा अनुभव घेत आहेत. बस स्थानकावर वाहने उभी करतांना अडचणीचे ठरत आहे. वाहनाची वर्दळ राहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सिहोरा ते बपेरा गावापर्यंत राज्य मार्गाची अवस्था संतापजनक झाली आहे.
चुल्हाड गावाचे शेजारी राज्य मार्गाचे खड्यात मुरुमाचे चादर लावण्यात आली आहेत. तुमसर ते बपेरा गावापर्यंत आणि महालगाव फाटा ते नाकाडोंगरी पर्यंत एका नामांकित कंत्राटदाराने राज्य मार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम केले आहेत. खड्यात पेचीस लावले असले तरी, दोन महिण्यात खड्याची अवस्था जैसे थे झाली आहे.
या खड्यात आता मुरुम लावण्यात आले आहे. पेचीस लावण्यात शासनाचे निधीचा चुराडा झाला असून कंत्राटदाराला मालामाल करण्यात आलेला आहे. राज्य मार्गावर पेचीस धोवडा झाला असून हा धीवडा दडपण्यासाठी आता मुरुम लावण्यात येत असल्याचा आरोप आहे.
राज्य मार्गाची दुरुस्ती आणि नविनीकरण अडल्याने गावागावात रोष आहे. यातच शेजारी मध्यप्रदेशात जोडणारा राज्य मार्ग चकाचक करण्यात आला असल्याने त्यांचे हशांचे पात्र तुमसर बपेरा राज्य मार्ग ठरत आहे. राज्य र्मााचे दुरुस्ती वरुन सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा शांत आहे. यामुळे नागरिकांत नाराजीचा सुर आहे.
भौरगडपॅटर्न राबविण्याची गरज
नजिकच्या मध्यप्रदेशातील भौरगड गावात नागरिकांचे सेवेकरिता अनेक निर्णय घेण्यात आली आहेत. या गावात राज्य मार्गावर वाहने आढळल्यास रोज दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने राज्य मार्ग मोकळा राहत आहे. या शिवाय गावात रविवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने सर्व बँका दिवस भरासाठी सुरु ठेवण्यात येत आहेत. परंतु सिहोºयात विपरीत कामकाज आहे. अर्धेअधिक राज्य मार्गावर वाहने उीाी करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवार दिनी आठवडी बाजार असतांना दिवसभरासाठी बँका सुरु ठेवण्यात येत नाही. यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करण्याची पाळी नागरिक आणि ग्राहकावर येत आहे. यामुळे या गावात भौरगड पॅटर्न राबविण्याची गरज आहे.

जनतेच्या सेवा आणि सुविधांकरिता या पॅटर्नवर अमलबजावणी करिता प्रयत्न करणार आहे. या शिवाय सर्व बँकाचे प्रतिनिधीची बैठक व समन्वयातून निर्णय करीता पुढाकार घेणार आहे.
- धनेंद्र तुरकर,
सभापती अर्थ व शिक्षण जि.प. भंडारा

Web Title: The narrow road in the Sahara leads to the congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.