लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:01+5:302021-02-05T08:43:01+5:30

प्रा. डॉ. माधव सरकुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून संविधानाची उद्देशिकेचे वाचन करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ ...

National Constitution Literary Conference at Lakhandur | लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

Next

प्रा. डॉ. माधव सरकुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून संविधानाची उद्देशिकेचे वाचन करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉचे प्राचार्य डॉ. राजन होते. यावेळी ॲड. संदेश भालेकर, ॲड. अब्दुल बशीर, पवन मेश्राम, आयोजक अनिल काणेकर उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात पंढरी गजभिये, मन्साराम दहिवले, ॲड. श्रावण उके, श्रीधर सावजकार यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच प्रा. विनोद बरडे, प्रा. हरिश्चंद्र बोरकर, महेंद्र राऊत यांचा अनिल काणेकर यांनी गौरव केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधानातील विविध पैलूंचे मार्गदर्शन केले.

यावेळी २० व्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तकाची तसेच यशवंत सिपोलकर यांनी लिहिलेल्या मानवी मूल्ये या काव्य संग्रहाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दुसऱ्या सत्रामध्ये विजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. याप्रसंगी यशवंत सिंपोलकर, गणेश कुंभारे, नीलिमा रंगारी, डॉ. योगेश राऊत, सतीश रंगारी, अशोक भजने, कलीराम मेश्राम, सुरेश मेश्राम, मधुकर शहारे, दिनेश अंबादे या कवी मंडळींनी कविता सादर करून उपस्थित श्रोतावृंदाची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर बांबोळे यांनी केले.

प्रास्ताविक अनिल काणेकर यांनी केले. संमेलनासाठी प्रशांत वरंभे व बहुजन विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: National Constitution Literary Conference at Lakhandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.