राष्ट्रीय महामार्गाचे पाणी शिरले ठाणा गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:21 PM2018-06-27T22:21:37+5:302018-06-27T22:22:00+5:30
राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे कामे दिलीप बिल्डकॉम यांनी केले. रहदारी गावालगत चौपदरीकरण तर दोन गावादरम्यान दोन रस्ते तयार करण्यात आले. गावादरम्यान राष्ट्रीय महामार्ग लगत बंदिस्त दोन ते तीन फुट खोल तीन फुट रुंदीची नाली बांधकाम करण्यात आले. नाली बांधकाम करीत असतांना गावाचे भौगोलिक वातावरण विचारात न घेता किंवा गावाबाहेर पावसाचे पाणी वाहून न जाता रहदारीत उतार करण्यात आला. दुसरी बाब म्हणजे नाली बांधकामाला कसलाही अडथळा नसतानाही ठाणा टी पांईट स्थित नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशी बसस्थानकाजवळ अर्धवट नाली बांधकाम करण्यात आले. जवाहरनगर आयुध निर्माण गेटच्या दोन्ही बाजुला अर्धवट नाली तयार करण्यात आली. मात्र गेटच्या जवळून नाली बांधकाम करण्यात आलेली नाही. परिणामी सोनामाता नगर महामार्गापासून अर्धा किलोमिटर नाल्याचे पावसाचे पाणी ठाणा टी-पांईट बसस्थानकापासून अर्धवट नाल्याद्वारे जवाहरनगर रस्त्याने ठाणा रहदारीत शिरकाव होत आहे. यामुळे ठाणा येथील रस्त्याची नासधुस होत आहे. खासगी विहिरीत दुषीत पाण्याचा शिरकाव होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. ठाणा येथील कॉर्पोरेशन बँकेसमोर डॉ.मणी यांच्या दवाखान्याजवळ, आयुध निर्माणी पतसंस्थाचे पेट्रोलपंप जवळ, जुन्या राष्ट्रीय महामार्ग केशव लेंडे यांच्या घराजवळ, अर्धवट नाली बांधकाम केले आहे. दहा वर्ष लोटूनही प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लोकप्रतिनिध्ीांच्या वेळकाढू वृत्तीमुळे गावातील नागरिकांचे बेहाल होत आहे. मागीलवर्षी पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या घरामध्ये तीन ते चार फुट पाणी शिरलेले होते. याची जाणीव कुणालाही नाही.