राष्ट्रीय महामार्ग पावसाचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:41 AM2021-09-15T04:41:07+5:302021-09-15T04:41:07+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत खासगी कंत्राटदारद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व गावांतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आले. मात्र ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत खासगी कंत्राटदारद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व गावांतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आले. मात्र ठाणा राष्ट्रीय महामार्ग सोनामाता नगर ते जुना ठाणा राष्ट्रीय महामार्ग पर्यंत गावांतर्गत रहदारी रस्ता बांधण्यात करण्यात आले नाही. नाल्यांचे बांधकाम अर्धवट तयार करण्यात आले. परिणामी सतत दरवर्षी रस्त्यावरील पावसाचे सांडपाणी रस्त्यावरच साचतो व काही ठिकाणी गावांमधून वाहून जात असतो. यामुळे खासगी विहिरी, हातपंपामध्ये दूषित पाण्याचा शिरकाव होतो गावातील रस्ते पाण्याच्या जलद प्रमाणे रस्त्यावर खड्डे पडतात त्याच्या परिणाम नागरिकांना प्रवास करणे त्यांना कठीण जात असतो तर ठाणा जवाहरनगर टी पाईंट नागपूर बसस्थानक समोर, ठाणा गॅस एजन्सी ते निर्माणी पतसंस्थेचे पेट्रोलपंप दरम्यान ,अर्धवट नाल्या बांधकाम केलेले आहेत. आणि रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन फूट खोल नाल्यामध्ये घनकचरा साचलेला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यातील घनकचरा काढण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही.