जनता विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:08+5:302021-03-01T04:41:08+5:30
लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात ...
लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे, सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी विज्ञान दिन साजरा केला जातो.
देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी विज्ञान दिनाचे आयोजन केले जाते, असे विज्ञान शिक्षक पंकज बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, कार्यक्रमाला मुख्याध्यापक हेमंत केळवदे, ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी. पारधी, प्रमोद संग्रामे, मनीष साठवणे, मंगला बोरकर, राखी बिसेन, उके यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.